आरडीएक्स ग्रुप सावंतवाडी द्वितीय; ज्ञानदीप कला मंच मळेवाड यांचा तृतीय क्रमांक
सावंतवाडी : कवठणी येथील उद्योजक दत्ता कवठणकर मित्रमंडळ आयोजित राज्यस्तरीय खुल्या ग्रुप डान्स स्पर्ध्येत रत्नागिरी-खेड येथील ओम साईराम ग्रुपने प्रथम पारितोषिक पटकावले. तर द्वितीय आर डी एक्स ग्रुप सावंतवाडी व तृतीय ज्ञानदीप कलामंच मळेवाड यांना देण्यात आले. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई व गोवा राज्यातील ग्रुपनी या स्पर्ध्येत सहभाग घेतला होता. स्पर्ध्येचे औचित्य साधून “गावय” नाटकाचे दिग्दर्शक रुपेश कवठणकर, कलाकार रवींद्र हळदणकर, पपी कवठणकर, यामेश्वर कवठणकर यांना माजी महिला व बाल कल्याण सभापती शर्वाणी गावकर यांच्याहस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. कवठणीतील ग्रुप डान्स स्पर्ध्येला दरवर्षी सहकार्य करणाऱ्या ॲड. निलोफर खान, कोरिओग्राफर सुदेश साळगावकर तसेच तिमिराकडून तेजाकडे संस्थेचे संस्थापक सत्यवान रेडकर यांना उद्योजक दत्ता कवठणकर यांच्याकडून गौरविण्यात आले. ग्रुप डान्स उत्तेजनार्थ प्रथम व्ही आर ग्रुप देवगड, द्वितीय सिधाई ग्रुप कुडाळ, तृतीय आघोरे ग्रुप मुंबई व उत्तेजनार्थ चौथे बक्षीस एस के ग्रुप कणकवली यांना देण्यात आले. प्रथम विजेत्या ओम साईराम ग्रुपला रु २५ हजार, उपविजेत्या आर डी एक्स ग्रुपला रु १५ हजार, तृतीय पारितोषिक विजेत्या ज्ञानदीप कलामंच ग्रुपला रु १० हजार व चषक देण्यात आले. उत्तेजनार्थ बक्षीस विजेत्या डान्स ग्रुपना रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देण्यात आले. स्पर्ध्येचे बक्षीस वितरण उद्योजक दत्ता कवठणकर, कवठणी गावचे सरपंच अजित कवठणकर,ग्रामपंचायत सदस्य यामेश्वर कवठणकर,तिमिराकडून तेजाकडे संस्थेचे संस्थापक सत्यवान रेडकर,परीक्षक ॲड. निलोफर खान, सुदेश साळगावकर,निवेदक शुभम धुरी,मंडळाचे कार्यकर्ते मयूर रेडकर, मुन्ना हळदणकर, राजन कवठणकर, नितेश कवठणकर, साई कवठणकर, प्रवीण कवठणकर, पपी कवठणकर, संजय कवठणकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.