३९ कोटी रुपये वापरून मिरकरवाडा विकासाला होणार सुरुवात
मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचे आदेश
रत्नागिरी : मिरकरवाडा जेटी भोवती कंपाऊंड वॉल बांधून तेथील विकासात्मक कामांना सुरुवात केली जाईल, तर मिरकरवाडा पॅटर्न प्रमाणे किनारपट्टीवरील अतिक्रमण हटवण्या बाबत नोटिसा बजावण्याचे आदेश आजच्या बैठकीत मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी रत्नागिरीतील बैठकीत दिले. तर रत्नागिरी पोलिसांनी अतिक्रमण हटवताना मिळालेल्या सहकार्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून कौतुक त्यांनी केले.
ना. नितेश राणे यांनी घेतलेल्या बैठकीला…. उपस्थित होते. यावेळी भादुले यांनी आगामी काळात मिरकरवाडा येथे कोणत्या प्रकारची कामे केली जातील याची माहिती दिली. त्यामधे मिरकरवाडा विकासासाठी 39 कोटी रुपये प्राप्त आहेत. त्यातून प्रसाधन गृह, पाणी पुरवठा, विद्युत पुरवठा, जाळी विणण्यासाठी शेड, निवारा शेड, प्रशासकीय इमारत बांधणे, रेडिओ संपर्क विभाग, अशी विविध 19 कामे यात केली जाणार आहेत. यामध्ये मिरकरवाडा येथे कंपाऊंड वॉल बांधण्याचे काम प्राधान्याने घ्यावे असे आदेश ना. नितेश राणे यांनी दिले. तर मिरकरवाडा येथील समुद्रात काही कंपन्यां मधून येणारे तसेच वस्त्यांमधून येणारे सांडपाणी मोठ्या प्रमाणत सोडण्यात येते त्यावर तत्काळ कारवाई करावी असेही त्यांनी सांगितले.
तसेच मिरकरवाडा पॅटर्न प्रमाणे किनारपट्टीवरील साखरी नाटे पासून बंदरातील अनधिकृत बांधकामे हटविण्याची मोहीम हाती घेण्याचे आदेश ना. राणे यांनी दिले. यासाठी अशा भागातील अनधिकृत बांधकाम धारकांना नोटीस बजावण्याची सूचना केली. सध्या जयगड साखरी नाटे बरोबरच आता हर्णे बंदर ला सुध्दा द्रोण देण्यात आला आहे. त्यामुळे अनधिकृत मासेमारीला मोठ्या प्रमाणात आळा बसला आहे तर अनधिकृत मासेमारी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून ती वसुली करण्यात आल्याचे यावेळी भादुले यांनी सांगितले.
यावेळी ना. राणे मत्स्य व्यवसाय विभगसोबतच पोलीस विभागाने मिरकरवाडा येथील अतिक्रमण हटवण्यात महत्त्वाची जबाबदारी स्वीकारून ती यशस्वी केल्याबद्दल ना. नितेश राणे यांनी त्यांचे अभिनंदन करून कौतुक केले.