11.5 C
New York
Friday, March 14, 2025

Buy now

सिंधुदुर्ग जिल्हा आमचं कुटुंब प्रत्येकाची सुरक्षेची जबाबदारी आमची – पालकमंत्री नितेश राणे

कुडाळ येथे ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा, हेल्पलाइनचे लोकार्पण…  

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा आमचं कुटुंब आहे आणि या कुटुंबातील प्रत्येकांची सुरक्षा आणि त्यांना विश्वास देण्याची जबाबदारी आमच्या सोबत प्रशासनाची आहे. त्यामुळे कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी आज येथे व्यक्त केला. सिंधुदुर्ग पोलिसांच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाइनचे लोकार्पण श्री. राणे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार माजी मंत्री दीपक केसरकर, विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे पद्मश्री परशुराम गंगावणे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल अपर अधीक्षक कृषिकेश रावले, ज्येष्ठ लेखिका वृंदा कांबळी, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष भालचंद्र मराठे आदी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!