बाळु सावंतांचे आवाहन ; अन्यथा अन्नधान्याचा लाभ बंद होणार…
बांदा : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजने अंतर्गत शिधापत्रिका धारकांना शासकीय अनुदानित धान्याचा लाभ सुरु ठेवण्यासाठी कुटुंबातील रेशनकार्ड मध्ये नोंदणी केलेल्या सर्व सदस्यांचे ई-केवायसी १५ फेब्रुवारी पर्यंत पूर्ण करावे अन्यथा त्यांना अन्नधान्याचा लाभ बंद होणार आहे. त्यासाठी लवकरात-लवकर ई केवायसी करून घेण्याचे आवाहन बांदा विकास सोसायटीचे अध्यक्ष राजाराम उर्फ बाळु सावंत यांनी केले आहे. रास्त धान्य दुकानात कार्यालयीन वेळेत जाऊन ई-केवायसी करून घ्यावी. यासाठी रेशनकार्ड व आधारकार्ड आवश्यक आहे. अन्नधान्याचा लाभ सुरळीत सुरु ठेवण्यासाठी लाभार्थ्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्यावी. न केल्यास सर्वस्वी जबाबदारी ही लाभार्थ्यांची राहणार आहे.