बांदा : शिवजयंतीचे औचित्य साधून दरवर्षी प्रमाणे श्री स्वराज्य प्रतिष्ठान बांदा तर्फे ९ फेब्रुवारीला जिल्हास्तरीय रंगभरण व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा आळवाडा येथील अटलबिहारी वाजपेयी उद्यानात निसर्गाच्या सानिध्यात संपन्न होणार आहे. ही स्पर्धा एकूण ४ गटात होणार आहे, यात अंगणवाडी ते पहिली गटासाठी रंगभरण स्पर्धा आणि दुसरी ते चौथी, पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी या तिन्ही गटासाठी शिवरायांच्या जीवनातील प्रसंग हा विषय ठेवण्यात आला आहे. स्पर्धेतील विजेत्यांना १९ फेब्रुवारी रोजी मुख्य कार्यक्रमात रोख पारितोषिक, प्रमाणपत्र व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी संकेत वेंगुर्लेकर 9011107562, शुभम बांदेकर 9403489568 किंवा केदार कणबर्गी 9422394075 यांच्याशी संपर्क साधावा.