कोल्हापुर : कोल्हापुरातील राजारामपुरी पोलिसांनी गांजा सेवन करताना शुभम शेलार याला ताब्यात घेतलं होत. चौकशीत त्यानं राजारामपुरी मातंग वसाहत इथल्या किरण अवघडे याच्याकडून गांजा. खरेदी केल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी किरण अवघडे याच्या मातंग वसाहतीमधील घरी छापा टाकत ५५ हजार रूपये किंमतीच्या २ किलो गांजासह अवघडे याला ताब्यात घेतलं. आज पोलिसांनी किरण अवघडे आणि गांजा सेवन करणारा शुभम शेलार याची मातंग वसाहत परिसरातून धिंड काढली. पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोणीही अवैधरित्या अमली पदार्थांचा साठा अथवा विक्री करत असल्यास त्याची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन राजारामपुरीचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी केलंय. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने, सहायक फौजदार समीर शेख, संदीप सावंत, अमोल पाटील, सुशांत तळप, विशाल शिरगावकर, नितीश बागडी, सुरेश काळे यांनी सहभाग घेतला.