खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती
वैभववाडी : सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा 37 वा वार्षिक व्यापारी एकता मेळावा व पुरस्कार वितरण सोहळा आज शुक्रवार दिनांक ३१ जानेवारी रोजी वैभववाडी येथे संपन्न होणार आहे. या मेळाव्याचे आयोजन वैभवाडी तालुका व्यापारी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
या व्यापारी एकता मेळाव्याचे औचित्य साधून कोकणचे भाग्यविधाते, माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे व मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे उपस्थित राहणार आहेत.
याप्रसंगी जिल्ह्यातील तमाम व्यापारी वर्गाच्या वतीने खासदार नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे. वैभववाडी येथील अर्जुन रावराणे विद्यालयाच्या पटांगणावर हा मेळावा होणार आहे. याठिकाणी भव्य मंडप तसेच व्यासपीठ उभारण्यात आले आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा पुढीलप्रमाणे – प्रथम सत्र – शुक्रवार दि. 31 जानेवारी रोजी सकाळी 8.30 ते 10.30 वाजता शोभायात्रा, नोंदणी, स्वागत व अल्पोपहार, सकाळी 10. 30 ते 10. 45 वा. स्वागताध्यक्षांचे मनोगत, नगराध्यक्षांकडून शुभेच्छा, तालुकाध्यक्षांचे मनोगत, 10. 45 वा. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते 37 व्या व्यापारी एकता मेळाव्याचे उद्घाटन, 10:45 ते 2 वार्षिक अहवालाचे वाचन, तसेच खासदार नारायण राणे, नामदार नितेश राणे यांचा भव्य नागरी सत्कार संपन्न होणार आहे. सत्काराला उत्तर व मार्गदर्शन, पुरस्कार वितरण सोहळा, प्रमुख वक्ते प्रसाद कुलकर्णी यांचे विचारदर्शन, अध्यक्ष मनोगत व प्रथम सत्राचा समारोप. दुपारी 2 ते 2:30 सहभोजन, गावभेटी व मनोरंजन कार्यक्रमाचे सादरीकरण.
द्वितीय सत्र – दुपारी 2.30 ते 5.30 वा. द्वितीय सत्राचा शुभारंभ, श्री श्रीकांत पाटील यांचे स्टार्ट अप इंडिया याविषयी नवउद्योजकांना मार्गदर्शन, आतिष कुलकर्णी व विनोद मेस्त्री यांचा परिसरवादात्मक कार्यक्रम, कार्पोरेट शिवराय मिशन अफजलखान अर्थात हमखास यशाचा मार्ग, 31 जानेवारी 2026 च्या नियोजित 38 व्या व्यापारी एकता मेळाव्याच्या आयोजनाची सूत्रे देवगड व्यापारी संघाकडे सुपूर्द, भेटवस्तूंची सोडत व राष्ट्रगीताने मेळाव्याचा समारोप होणार आहे.
या मेळाव्याला मोठ्या संख्येने जिल्ह्यातील तसेच सर्व व्यापारी, तालुक्यातील व्यापारी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वैभववाडी तालुका व्यापारी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.