0.7 C
New York
Wednesday, February 12, 2025

Buy now

मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री ना. नितेश राणे यांचे कनेडी प्रभागात जंगी स्वागत

भिरवंडे मुख्य रस्ता नुतनीकरण आणि भिरवंडे हनुमंतवाडी ब्रिज कामाचे पालकमंत्री ना.नितेश राणे यांच्या हस्ते भुमीपूजन

कणकवली | मयुर ठाकूर : विधानसभा निवडणुकीत तुम्ही भरघोस मतदान करा भिरवंडे वासियांना गावच्या विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असा शब्द मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी दिला होता. देऊ तो शब्द पूर्ण करू या विश्वासू वाक्याप्रमाणे राज्य शासनाच्या बजेट योजने मधून मंजूर करण्यात आलेल्या भिरवंडे हनुमंतवाडी येथे ब्रिज बांधणी कामासाठी २ कोटी २५ लाख रुपये व सांगवे गणेश मंदिर ते भिरवंडे रामेश्वर मंदिर पर्यंत मुख्य रस्ता ५० लाख या विकास कामांचा शुभारंभ मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री ना. नितेश राणे यांचा हस्ते शनिवारी सकाळी करण्यात आला.

यावेळी मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी यापुढेही गावच्या विकास कामांसाठी भरगोस असा निधी उपलब्ध करून देण्यात येईल असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी माजी जि.प.अध्यक्ष संदेश उर्फ गोटया सावंत, माजी जि. प. अध्यक्षा संजना सावंत, शिवसेना शिंदे गट उपजिल्हाप्रमुख महेंद्र सावंत, उपतालुकाप्रमुख सुनील सावंत, जेष्ठ ग्रामस्थ गणपत सावंत गुरुजी, माजी सरपंच आबा सावंत, शक्ती केंद्र प्रमुख श्रीकांत सावंत, बूथ प्रमुख संतोष सावंत, आशिष सावंत, संदीप सावंत व भिरवंडे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान यावेळी रामेश्वर मंदिर येथे देवालय संचालक मंडळ व भिरवंडे ग्रामस्थ यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. विकास कामांसाठी निधी दिल्या बद्दल भिरवंडे ग्रामस्थांनी मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री ना. नितेश राणे यांचे आभार मानले. तसेच पालकमंत्री मंत्री पदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच कनेडी प्रभागात आलेल्या मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री ना. नितेश राणे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांची आतिशबाजी करत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!