1.6 C
New York
Wednesday, February 12, 2025

Buy now

KANKAVLI | दोन बांगलादेशी महिलांना सिंधुदुर्गच्या दहशतवाद विरोधी पथकाने घेतले ताब्यात

कणकवली पोलीस ठाण्यात केली कसून चौकशी ; उद्या करणार न्यायालयात हजर

कणकवली : रेल्वे स्थानकावर बुधवारी ५:३० वाजण्याच्या सुमारास दोन बांगलादेशी महिलांना सिंधुदुर्ग एटीएस च्या पथकाने ताब्यात घेतले आहे. यामध्ये साथी अतुल माझी ( वय ३२, रा. कल्याण ईस्ट, मुंबई मूळ रा. लेबु खाली ता. डोगरी, जिल्हा ढाका बांगलादेश), लिझा रहीम शेख ( वय २८, सध्या रा. बी विंग मेरिडियन गोल्ड सोसायटी, हडपसर पुणे, मूळ रा. ढाका बांगलादेश ) अशी दोन्ही महिलांची नावे आहेत.
एटीएस पथकातील पीएसआय सुखदेव शेवाळे, ए एस आय उन्मेष पेडणेकर, पोलीस नाईक रोहन चंद्रकांत सावंत यांच्यासह कणकवली पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक रुपेश गुरव, अंमलदार किरण मेथे, महिला अंमलदार सुप्रिया भागवत यांनी ही कारवाई केली.
यामध्ये स्थानकावर आलेल्या दोन्ही बांगलादेशी महिलांची तपासणी केली असता भारतीय अधिवसाचे कोणतेही कागदपत्र आढळले नाहीत तसेच याबाबतची गोपनीय माहिती एटीएस च्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पीएसआय सुखदेव शेवाळे यांनी दिली. गोपनीय माहिती मिळाल्यापासून एटीएस चे पथक मध्यरात्री ३ वाजल्यापासून कणकवलीत दाखल झाले होते. दरम्यान कणकवली पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांसह ए टी एस च्या पथकाने कणकवली रेल्वे स्टेशनवर सापळा रचला होता.
सदरील महिलांना ताब्यात घेऊन कणकवली पोलीस ठाण्यात आणून कणकवली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. याबाबत ची फिर्याद ए टी एस पथकाचे पोलिस नाईक रोहन सावंत यांनी दिली आहे. विदेशी पारपत्र कलम १४ अ, पारपत्र १९५० नियम ३ अ ६ अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!