1.6 C
New York
Wednesday, February 12, 2025

Buy now

बीएसएनएलची केबल चोरी करणारा चोरटा ताब्यात

२९ हजार रुपयांची २३० मीटर केबलची केली चोरी

कणकवली : सांगवे केळीचीवाडी येथे बीएसएनएलची वायर चोरी करत असणाऱ्या एका चोरट्यास ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. परवेझ उस्मान शेख (४५, रा. देवगड किल्ला, सध्या रा. हरकुळ बुद्रुक पटेलवाडी) असे संशय चोरट्याचे नाव आहे. गेल्या पाच दिवसात बीएसएनएलची २०० ते २५० मीटर असे एकूण २९ हजार रुपयेची कोपर वायर चोरीच गेली आहे. ही घटना रविवारी दुपारी सांगवे केळीचीवाडी येथे घडली. याबाबतची फिर्याद बीएसएनएलचे कणकवली- वैभववाडी डिव्हिजनल इंजिनियर चिदंबर प्रभाकर कुलकर्णी यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे.

गेल्या काही दिवसापासून सांगवे केळीची वाडी येथे बीएसएनएलची वायर चोरी होत असल्याची घटना घडत होती. या भागातील बीएसएनएलची सेवा सुरू नसल्याबाबतची अनेक तक्रारी बीएसएनएल कडे आल्या होत्या. बीएसएनएलचे अधिकारी व कर्मचारी यांनी अनेक वेळा तीन लाईन दुरुस्त केली होती. मात्र गेल्या पाच दिवसापासून दररोज एक व्यक्ती बीएसएनएल ची वायर घेऊन जात असताना ग्रामस्थांच्या निदर्शनास आला होता. बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी याबाबतची माहिती दिली होती. त्यानुसार बीएसएनएलचे सांगवे – कनेडी लाईनमन सुभाष पाताडे यांनी पहाणी केली तेव्हा काही भागातील लाईन कट करून नेलेली दिसून आली. त्यादरम्यान रविवारी तोच व्यक्ती बीएसएनएलची कॉपर वायर चोरी करत असताना ग्रामस्थांना दिसून आला. त्यावेळी ग्रामस्थांनी त्याला पकडून चांगलाच चोप दिला तसेच याबाबतची माहिती बीएसएनएलचे अधिकारी व पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच हवालदार मिलिंद देसाई ही घटनास्थळी दाखल झाले यावेळी ग्रामस्थांनी संशयित परवेझ उस्मान शेख याला पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानुसार कणकवली पोलीस ठाण्यात सायंकाळी उशिरापर्यंत परवेझ शेख याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!