कोळपे ग्रामपंचायत दिलीप कांबळे, शुभांगी सिताराम कांबळे, रजिया सरदार ठाणगे, अशा तीन सदस्यांचा भाजपात प्रवेश
उबाठाचे तालुका उपाध्यक्ष शाबान राऊत यांच्यासह मोठ्या संख्येने मुस्लीम बांधवांचा भाजपात प्रवेश
मंत्री ना. नितेश राणे यांनी सर्वांचे केले पक्षात स्वागत
कणकवली | मयुर ठाकूर : कोळपे गावचे उबाठा सेनेचे अल्पसंख्यांक सेल तालुका उपाध्यक्ष शाबान राऊत तसेच ग्रामपंचायतचे तीन सदस्य यांनी मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. सदस्यांमध्ये दिलीप कांबळे, शुभांगी कांबळे, रजिया सरदार ठाणगे यांचा समावेश आहे. तसेच अन्य असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. आमदार नितेश राणे यांनी त्यांचे पक्षात जंगी स्वागत केले. राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नामदार नितेश राणे यांचा वैभववाडी नगरीत नागरी सत्कार पार पडला. याप्रसंगी पक्षप्रवेश पार पडला. यावेळी तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रवेश करणाऱ्यांमध्ये फिरोज रामदुल, मजीद नंदकर, हासन नंदकर, सरदार ठाणगे, अशोक कांबळे, मुस्ताक नाचरे, निजाम नंदकर, रमजान नंदकर, उमर थोडगे, इस्माईल नाचरे, गौस लांजेकर, अफताब चोचे व अन्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे. यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.