कुडाळ : लायन्स क्लब ऑफ कुडाळ आयोजित फूड फेस्टिव्हलमध्ये नवीन वर्ष २०२५चे स्वागत आणि सरत्या वर्षाला निरोप या पार्श्वभूमीवर जल्लोषी वातावरणात हजारो रसिकांच्या उपस्थितीत हा नेत्रदीपक सोहळा दिमाखदारपणे साजरा करण्यात आला. सिनेसृष्टीतील नामांकित कलावंतानी चौथ्या दिवसाच्या फूड फेस्टिवलची अनोखी रात्र आपल्या सुरेल गायनाने व नृत्याविष्काराने डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरविली.
२३ व्या लायन्स फूड फेस्टिव्हलला कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर चौथ्या दिवशी हजारोंची उपस्थितीत शानदार सांगता झाली. ३१ रोजी सई एंटरटेनमेंट प्रस्तुत डान्स अँड म्युझिकल लाइव्ह कंसर्ट आयोजित या कार्यक्रमात एकत्रितपणे विविध वाद्यकार, गायक आणि नर्तक यांनी आपली कला सादर केली. सुप्रसिद्ध गायकांच्या यादीत अनुष्का शिकतोडे (सूर नवा ध्यास नवा फेम), धनश्री कोरगावकर (महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम), गणेश मेस्त्री (इंडियन आयडॉल फेम) आणि हर्षद मेस्त्री (स्वरकोकण रत्न) यांसारख्या प्रतिभावन प्रसिद्ध कलाकारांनी आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. या शिवाय, उत्कृष्ट अभिनेत्री, मॉडेल, नृत्यांगना आणि कोरियोग्राफर मिनाक्षी पोशे यांचे नृत्य लक्षवेधी ठरले. एकाहून एक गीते सादर करत उत्तरोत्तर हा सोहळा अधिकच रंगतदार ठरला कार्यक्रमाची सांगता झाली. या संगीत रजनी कार्यक्रमात संगीत साथ गिटार प्रवीण जाधव, सांगली हँडसोनीक, ढोलक, डोलकी- शेखर सर्पे, कणकवली ऑक्टोपॅड : हर्षद खराडे, मालवण, सिंथेसाईजर : दिनेश वालावलकर, वालावल तबला, डफ, तुंबा, ऑक्टोपॅड : सचिन कुडतडकर परकर्षण : युवराज कुर्ले गौरव पिंगुळकर ढोलक, ढोलकी, संबळ, गंधार कदम यांनी दिली. फूड फेस्टिव्हलमध्ये नवीन वर्षाचे स्वागत आणि सरत्या वर्षाला निरोप या पार्श्वभूमीवर जल्लोषी वातावरणात हजारो रसिकांच्या उपस्थितीत हा नेत्रदीपक सोहळा साजरा झाला.