कणकवली : डिसेंबर २०२४ पर्यंत कणकवली पोलिसांकडून गहाळ झालेले मोबाईल हस्तगत करण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी पार पाडण्यात आली आहे. या अंतर्गत १ लाख ४७ हजार रुपयांचे महागड्या कंपनीचे मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. यात कर्नाटक, कोल्हापूर, मुंबई, गोवा अशा भागांमधून पोलिसांनी मोबाईल हस्तगत केले आहेत. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कणकवली पोलिसांचे अभिनंदन केले जात आहे. या मध्ये विवो कंपनीचा २२ हजाराचा मोबाईल कर्नाटक, मोटोरोला कंपनीचा १५ हजार रुपयांचा कोल्हापूर, विवो कंपनी १४ हजार रुपयांचा मोबाईल कोल्हापूर, सॅमसंग कंपनीचा १२ हजार रुपयांचा मोबाईल सावंतवाडी, विवो कंपनी २० रुपयांचा मोबाईल गोवा, सॅमसंग कंपनीचा १३ हजार चा मोबाईल कणकवली, पोको कंपनीचा १५ हजार रुपयांचा मोबाईल आचरा, विवो कंपनीचा ३६ हजार रुपयांचा मोबाईल मुंबई असे तब्बल १ लाख ४७ हजार रुपयांचे मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.
कणकवली पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद देठे, पोलीस कॉन्स्टेबल नितीन बनसोडे यांनी ही कारवाई केली. कणकवली पोलिसांच्या या कामगिरीबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे.