कणकवली | मयुर ठाकूर : कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांना मंत्रिपद जाहीर झाले. यानंतर आमदार नितेश राणे केव्हा मंत्री पदाची शपथ घेणार यांची उत्ससूकता लागून राहिली होती. अखेर आज आ. नितेश राणे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. याच पार्श्वभूमीवर कणकवली शहरात शपथविधी पाहण्यासाठी थेट लाईव्ह स्क्रिन लावण्यात आली होती.
दरम्यान आ. नितेश राणे यांनी शपथ घेताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी व फटाके लावून जल्लोष साजरा केला. यावेळी हमारा नेता कैसा हो … नितेश राणे जैसा हो, नितेश राणे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है घोषणा देण्यात आल्या. दरम्यान यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांना लाडू भरवून आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी शहराध्यक्ष अण्णा कोदे, जिल्हा बँक संचालिका प्रज्ञा ढवण, माजी नगरसेविका प्राची कर्पे, संजना सदडेकर, माजी नगरसेवक शिशिर परुळेकर, सचिन पारधिये, जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई, शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रकाश सावंत, सुशील पारकर, नामदेव जाधव, विजय चिंदरकर, विजय इंगळे, बबलू सावंत, किशोर राणे, सागर राणे, राज नलावडे, सदाशिव राणे, आदी उपस्थित होते.