नागपूर : आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहात. तयार राहा, तुमचं अभिनंदन… असे फोन भाजपकडून संभाव्य मंत्र्यांना जायला सुरुवात झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. भाजपकडून आज सकाळी सकाळीच पहिला फोन नितेश राणे यांना गेला आहे. त्यामुळे नितेश राणे हे राज्यात पहिल्यांदाच मंत्री होणार असल्याचं दिसत आहे. आज दुपारी नागपुरात मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. त्यावेळी एकूण 32 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते देखील नागपूर येथे रवाना झाले आहेत.