जिल्हा प्रशासनाकडून टी.बी मुक्त ग्रामपंचायतीचा पुरस्काराने गौरव
सिंधुदुर्गनगरी : क्षयरोग हा संसर्गजन्य आजार नसला तरी तो औषधोपचाराने बरा होतो. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा क्षयरोग मुक्त करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करूया, असे आवाहन जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी आज येथे केले.टी.बी मुक्त ग्रामपंचायतींना जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी जिल्हा नियोजन सभागृह आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, किशोर काळे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी आदी उपस्थित होते.