मजूर कामगार राजेंद्रच्या कुटुंबियांची हाक
कणकवली : राजेंद्र सावळाराम चव्हाण ह्या 49 वर्षीय मजूर कामगाराला तोंडाच्या कॅन्सर झाला आणि आधीच हातातोंडाची भेट अवघड असलेल्या चव्हाण कुटुंबीय आणखीनच आर्थिक मेटाकुटीला आले. राजेंद्र याना तोंडाचा कॅन्सर असल्याचे निदान झाल्यावर त्यांच्यावर 13 नोव्हेंबर 2024 रोजी कॅन्सर ची शस्स्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया जरी शासकीय योजनेतून झाली असली तरी अन्य औषधोपचार साठी सुमारे 40 ते 45 हजार पर्यंत खर्च झाला आहे. त्यातच ऑपरेशन नंतर रेडीएशन थेरपी साठी आजरा कोल्हापूर येथे 16 डिसेंबर पासून उपचार घ्यावे लागणार आहेत. यासाठी अजून 50 हजार खर्च अपेक्षित आहे. मूळ नवीन कुर्ली वसाहत फोंडाघाट येथील आणि सध्या कणकवली बांधकरवाडी येथे भाड्याच्या खोलीत राहणारे राजेंद्र चव्हाण हे मजुर कामगार गवंडी कामगार म्हणून काम करतात. त्यांची पत्नी कणकवलीतच घरकाम करून कुटुंबाला हातभार लावते. तर मोठा मुलगा 4 महिन्यांपूर्वीच ग्रॅज्युएट झाला असून वडिलांच्या आजारपणात वडिलांच्या सेवेसाठी मुंबईतील खाजगी नोकरी सोडून तो कणकवलीत एका दुकानात काम करत आहे. तर दुसरा मुलगा यावर्षी दहावीत शिकत आहे. आधीच आर्थिक ओढाताण आणि त्यात कॅन्सर सारख्या अतिगंभीर आजाराने घरचा कमावता पुरुषच अंथरुणाला खिळून असल्यामुळे चव्हाण कुटुंबीय हवालदिल झाले आहे. समाजातील दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी राजेंद्र चव्हाण यांच्या कॅन्सर वरील उपचारासाठी आर्थिक हातभार लावत माणुसकी धर्म जपण्याचे आवाहन करत आहोत. ज्यांना राजेंद्र चव्हाण यांच्या वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत करायची असेल त्यांनी चेतन राजेंद्र चव्हाण पेटीएम नं 7620542830 येथे अथवा चेतन राजेंद्र चव्हाण, बँक ऑफ महाराष्ट्र शाखा फोंडाघाट,
IFSC CODE -MAHB0000069
अकाउंट नं. 25039679707 येथे रक्कम जमा करावी. अधिक माहितीसाठी राजेंद्र यांचा मुलगा चेतन याच्याशी मोबाईल नं 7620542830 यावर संपर्क साधावा.