कणकवली : पत्नी सोबत राहत नाही म्हणून नैराश्येपोटी करंजे – बौद्धवाडीतील मंगेश नारायण कदम (५०) यांनी घराच्या छप्पराच्या लोखंडी अँगलला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगेश कदम याला दारूचे व्यसन होत म्हणून पत्नी त्यांच्यासोबत राहत नव्हती.
मंगेश कदम यांचे वाडीतील विजय शंकर कदम याच्याकडे येणे- जाणे होते. परंतु ७ ते ९ डिसेंबर या कालावधीत ते कुठे दिसले नाही म्हणून विजय कदम याने त्याच्या घरी जाऊन पाहिले असता घरात फासाला लटकताना दिसला. ७ ते ९ डिसेंबर या कालावधीत त्यानी आत्महत्या केल्याचे फिर्यादित विजय कदम यांनी म्हटले आहे.