सिंधुदुर्ग : भाजपा नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजप प्रांतिक सदस्य दत्ता सामंत व मालवण येथील भाजप पदाधिकारी कार्यकर्ते यांनी कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी मंत्री नारायण राणे यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी हापूस आंब्यांचा हार दत्ता सामंत यांनी मंत्री नारायण राणे यांना दिला.
यावेळी आमदार नितेश राणे यांसह भाजप पदाधिकारी विजय केनवडेकर, दीपक पाटकर, राजु परुळेकर, गणेश कुशे, नाना साईल, प्रशांत परब, महेश सारंग, राजु बिडये, भाई मांजरेकर, शानू वालावलकर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.