3.2 C
New York
Wednesday, December 4, 2024

Buy now

सहलीवरून परतणाऱ्या बसला मध्यरात्री अपघात

कणकवली तालुक्यातील ओटव फाटा येथील घटना

कणकवली : तालुक्यातील मुंबई – गोवा महामार्गावर नांदगाव ओटव फाटा येथील ब्रिजवर असलेल्या डिव्हायडरच्या संरक्षक कठड्याला आदळून पुणे ते ओरोस पर्यंत विद्यार्थ्यांची सहल घेऊन येणारी एसटी बसचा मध्यरात्री २ च्या सुमारास अपघात झाला. सुदैवाने या अपघातामध्ये कोणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

परंतु काहींना किरकोळ दुखापत झाली आहेत. अपघाताची भीषणता एवढी होती की मध्यरात्री गाड झोपेत दोन वाजता मोठा आवाज झाला. एस टी बसचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महामार्गाच्या बाजूला नांदगाव पोलीस पाटील सौ. मोरजकर यांचे घर असल्याने त्यांना तो आवाज आलं. त्यांनी याबाबत तातडीने मदत मिळण्यासाठी बाजूलाच असलेले भूपेश मोरजकर यांना संपर्क साधून याबाबत माहिती दिली. तातडीने पोलीस पाटील सौ. मोरजकर, भुपेश मोरजकर, केदार खोत , प्रभाकर म्हसकर, दीक्षा मोरजकर यांनी तात्काळ धाव घेत जखमींना मदत केली. तसेच विद्यार्थ्यांना धीर दिला. तसेच येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांनीही मदतीसाठी धाव घेतली. अपघातातील किरकोळ जखमींना तातडीने १०८ रुग्णवाहिकेतून कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आले.

अपघाताची खबर नांदगाव पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस हवालदार चंद्रकांत झोरे, श्री. माने , तसेच महिला कॉन्स्टेबल प्रणाली जाधव हे घटनास्थळी दाखल झाले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!