कणकवली | मयुर ठाकूर : दर्पण प्रबोधिनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, विद्रोही कवी, आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते उत्तम पवार यांच्या जयंतीनिमित्त दर्पण प्रबोधिनी संस्थेतर्फे शहरातील एकदंत प्लाझा मधील कदम आय केअर सेंटर याठिकाणी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ४५ जणांनी रक्तदान केले.
या शिबिराचे उद्घाटन संस्थेचे सल्लागार नितीन कदम यांचे हस्ते झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष आनंद तांबे, प्रा. डॉ. सोमनाथ कदम, माजी अध्यक्ष राजेश कदम, उपाध्यक्ष नरेंद्र तांबे, सरचिटणीस सुभाष कदम, श्रीधर तांबे, नीलम पवार, रुपेश गरूड यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
उत्तम पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर आयोजित करण्याचा दर्पण प्रबोधिनीचा उपक्रम स्तुत्य आहे, असे नितीन कदम यांनी सांगतानाच संस्थेच्या सामाजिक कार्याला शुभेच्छा दिल्या. सोमनाथ कदम यांनी उत्तम पवार स्मृती जागवल्या. आनंद तांबे यांनी रक्तदान शिबिराला सहकार्य केलेल्या दात्यांचे, हितचिंतकांचे आभार मानले. प्रास्ताविक सुभाष कदम यांनी केले. सूत्रसंचालन नरेंद्र तांबे यांनी केले.
शिबीर यशस्वी होण्यासाठी जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढी विभागाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. निकिता आत्राम, अधिपरिचारिका प्रांजली परब, लॅब टेक्निशियन मयुरी शिंदे, कांचन परब, परिचर प्रथमेश घाडी यांच्यासह अन्य कर्मचार्यांचे सहकार्य लाभले. दरम्यान, रक्तदान शिबिराला विविध क्षेत्रातील मंडळींनी भेट देत संस्थेच्या आरोग्य विषयक उपक्रमाचे कौतुक केले.