10 C
New York
Tuesday, November 26, 2024

Buy now

भालचंद्र महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव

कणकवली येथे ४ ते ८ डिसेंबर दरम्यान विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम

कणकवली : कणकवलीचे श्रद्धास्थान परमहंस भालचंद्र महाराज यांचा ४७ वा पुण्यतिथी महोत्सव ४ ते ८ डिसेंबर या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी आश्रमात साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. या उत्सवानिमित्त होणाऱ्या कीर्तन महोत्सवात नामवंत कीर्तनकारांची कीर्तने ऐकण्याची संधी भाविकांना मिळणार आहे. ४ डिसेंबर रोजी पहाटे ५:३० ते ७:३० वाजता समाधीपूजन, काकडआरती, सकाळी ८:३० ते १२.३० सर्वभक्त कल्याणार्थ धार्मिक विधी भालचंद्र महारूद्र महाभिषेक अनुष्ठान, दुपारी १२:३० ते १ आरती, दुपारी १ ते ३ महाप्रसाद, ४ वाजेपर्यंत भजने, सायंकाळी ४ ते ७:३० वाजतापर्यंत कीर्तन महोत्सव, रात्री ८ वाजता दैनंदिन आरती, असे कार्यक्रम होणार आहेत. तर रविवार ८ डिसेंबर रोजी परमहंस भालचंद्र महाराज यांचा ४७ वा पुण्यतिथी दिन आहे. पहाटे ५:३० ते ८ समाधीपूजन, काकड आरती जपानुष्ठान, सकाळी ८ ते १०:३० भजने, सकाळी १०:३० ते १२:३० समाधीस्थानी मन्यूसुक्त पंचामृत अभिषेक, दुपारी १२:३० ते १ आरती, दुपारी १ ते ३ महाप्रसाद, दुपारी १ ते ५ भजने, सायंकाळी ५ वाजता परमहंस भालचंद्र महाराज यांच्या पालखीची भक्तगण व सिंधुदुर्ग वारकरी संप्रदाय यांच्यासमवेत कणकवली शहरातून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर आरती तर रात्री ११ वाजता दशावतारी नाटक पुण्यप्रभाव (भालचंद्र दशावतार नाट्यमंडळ, हळवल), असे कार्यक्रम होणार आहेत. या पुण्यतिथी महोत्सवाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन परमहंस भालचंद्र महाराज संस्थानचे अध्यक्ष सुरेश कामत यांनी केले आहे.

*नववा कीर्तन महोत्सव ठरणार आकर्षण*

४ ते ७ डिसेंबर या कालावधीत सायंकाळी ४ ते ७:३० या वेळेत ९ वाजता कीर्तन महोत्सव होणार आहे. ४ डिसेंबर रोजी कीर्तनकार ह.भ.प. लक्ष्मीप्रसाद शंकरराव पटवारी (रा. बीड) विषय – शिव समर्थ योग, ५ डिसेंबर रोजी कीर्तनकार ह.भ.प. नम्रता व्यास-निमकर (रा. पुणे) विषय – गावबा (संत एकनाथ महाराज)

६ डिसेंबर रोजी कीर्तन चंद्रिका ह.भ.प. मानसी बडवे (रा. पुणे) विषय ब्रम्हानंद महाराज यांचे तर ७ डिसेंबर रोजी कीर्तनकार ह.भ.प. मोहक रायकर (रा. डोंबिवली) यांचे कीर्तन विषय- श्रीराम भक्त शबरी अशा विषयांवर कीर्तने होणार आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!