कणकवली | मयुर ठाकूर : विश्व मानवाच्या कल्याणासाठी विश्वात्म देवा जवळ जो जे वांच्छील तो ते लाहो प्राणीजात असा आशीर्वाद देणारे योगीराज ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळा नाटळ कानडेवाडी येथे गुरुवार दिनांक २८ नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे. या निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन श्री ज्ञानेश्वर माऊली समाधी सोहळा कैवल्य सेवा मंडळामार्फत करण्यात आले आहे.
ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळ्या निमित्त स. ७ वा. ज्ञानेश्वर माऊली पूजन व अभिषेक, काकड आरती व भजन, स. ९ वा. स्मरणिका प्रकाशन रामचंद्र शिंदे, सूर्यकांत वारंग, महेश नारकर, गजानन रेवडेकर, विश्वनाथ गवंडळकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. ज्ञानेश्वर माऊली हरिपाठ, एकादश आवर्तन, दुपारी ३. वा. वारकरी स्पर्धा, चक्री कीर्तन यामध्ये नारायण नाईक, मधुकर महाडेश्वर, तुळशीदास भोजने, मधुसूदन चाळसकर, यशवंत गिरकर, दयानंद पांगम सहभागी होणार आहेत. संध्या. ५ वा. मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार होणार आहे. संध्या. ७ वा. योगीराज ज्ञानेश्वर माऊली समाधी सोहळा व अभंग गायन होणार आहे. रात्रौ.९ वा. विठ्ठल नामाचा गजर व दिंडी पसायदान असे कार्यक्रम संपन्न होणार आहेत.
यावेळी अध्यक्ष दयानंद पांगम, कार्याध्यक्ष मधुकर साळसकर, प्रसाद पांगम, उपाध्यक्ष तुळशीदास भोजने तसेच विश्वस्त कार्यकारिणी, महिला कार्यकर्त्या, आश्रयदाते व हितचिंतक नारायण नाईक, गोविंद परब, अशोक सानप, मधुकर महाडेश्वर, यशवंत गिरकर, मधुकर साळसकर, भगवान रावले, जनार्दन कदम, जयश्री भोजने, प्रल्हाद पांगम तसेच भाविक भक्त उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम प्रसाद बाबा पांगम कानडेवाडी यांच्या घरी होणार आहे. यासर्व कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन मंडळाच्या वतिने करण्यात आले आहे.