कणकवली शहरानजिक नागवे हद्दीतील घटना
रेल्वे पोलीस व कणकवली पोलीस घटनास्थळी दाखल
कणकवली : शहरानजीक नागवे हद्दीत असलेल्या रेल्वे रुळावर दुपारी १२:३० वाजता ( १०१०४ ) मुंबईच्या दिशेने जाणारी मांडवी एक्सप्रेस ही नागवे हद्दीत रेल्वे रुळावर आल्यावर निशिकांत भास्कर जाधव ( वय ३९, रा. शिरगाव बौद्धवाडी ) हे रेल्वे रुळाच्या बाजूला बसलेल्या स्थितीत मांडवी एक्सप्रेस च्या लोको पायलटला दिसून आले. रेल्वे जशी जवळ आली तशी निशिकांत भास्कर जाधव यांनी रुळावर झोकून दिले असल्याची माहिती मांडवी एक्सप्रेस चे लोकोपायलट यांनी दिली असल्याची माहिती रेल्वे पोलीस कॉन्स्टेबल एच. पी. शिंदे यांनी दिली. तसेच अपघातानंतर मांडवी एक्सप्रेस तब्बल १२ मिनिटे घटनास्थळाच्या पुढे थांबली होती, असेही श्री. शिंदे म्हणाले.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस कॉन्स्टेबल एच. पी. शिंदे, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश सावंत, पोलीस हवालदार विनोद सुपल, होमगार्ड अनिकेत राणे, महेश पाटील, घटनास्थळी दाखल झाले.
या अपघातात मयत झालेल्या निशिकांत जाधव यांच्या उजवा पाय, डावा हात, तसेच डोके फुटून मेंदू काहीसा बाहेर आलेला, डोळ्याला इजा झाली होती. निशिकांत जाधव यांचा मृतदेह नागवे येथील रेल्वे रुळावर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या डाव्या बाजूला पडला होता.
यावेळी सदर मृत व्यक्तीच्या किशात एक मजकूर लिहिलेली चिट्ठी देखील दिसून आली आहे. त्यामुळे निशिकांत जाधव यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय का घेतला असावा हे मात्र त्या चिट्ठीतील मजकुराने उघड होणार आहे. सदर चिट्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक देखील तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. पंचनामा करून झाल्यावर मृतदेह कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता.