मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाची भूमिका जाहीर केली आहे. त्यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे आभार मानले आहेत. राज ठाकरे यांच्या पाठिंब्यावर काय म्हणाले राज ठाकरे.
CM Shinde on Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मनसेच्या गुढीपाडव्या मेळाव्यात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी महायुतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वासाठी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे आता भाजपने त्यांचे आभार मानले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील त्यांचे आभार मानले आहेत.
‘मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि अभिनंदन करतो. त्यांनी कुठलीही शर्त ठेवलेली नाही. मोदीची देशाचा विकास करत आहेत. मोदीजींच्या नेतृत्वासाठी त्यांनी पाठिंबा दिला आहे. राज ठाकरे यांचा देखील पक्ष आहे. सगळ्यांना निवडणुका लढण्याचा हक्क आहे. ही शिवसेना बाळासाहेबांची आहे. ही काँग्रेसप्रणित शिवसेना नाही. सावकरांचा अपमान करणाऱ्या लोकांसोबत मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांनी आमच्यावर बोलू नये.’
‘मोदींवर आरोप करण्याचा त्यांना अधिकार नाही.कोविडमध्ये घरी बसून होते. तेव्ही मोदीजी देशासाठी काम करत होते. त्यांनी जगासाठी मदत पोहोचवली. रोकड पार्टीचे अध्यक्ष असं म्हणालो तर ते उचित ठरेल का.’असं देखील मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
‘पंतप्रधान मोदींचं महाराष्ट्रावर आधीपासून प्रेम आहे. राज्याच्या विकासात त्यांनी योगदान दिले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त जागा आम्ही जिंकू आणि त्यांचे हात मजबूत करु.’
मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, ‘मला राज्यसभा नको आणि विधानपरिषद ही नको. देशाला चांगल्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे. अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीतर माझं तोंड आहेच. पण माझं मनसैनिकांनी आता एकच सांगणं आहे. जोरात विधानसभेच्या कामाला लागा. मी लवकरच सगळ्यांना भेटायला येईल.’
नरेंद्र मोदी हे पंतप्रधान व्हावे ही गोष्ट मी आधी बोललो होतो. त्यांच्या पक्षातही हे कोणी बोललं नव्हतं. असं ही ते म्हणाले. पण महाराष्ट्रात जे सुरुये ते चांगलं नाही. याला राजमान्यता देऊ नका असंही ते म्हणाले.