समाजाच्या विरोधात भुमिका कोणीही घेवु नये; मी मुस्लीम समाजाचा विश्वास सार्थकी लावेन
कणकवली : संदेश पारकर यांना मतदान केलात तर ते मत संदेश पारकर म्हणजेच नितेश राणे मत जाईल. नितेश राणेंना मत म्हणजेच आपल्या समाजाच्या विरोधात मत जाईल. त्यामुळे नितेश राणे आणि संदेश पारकर एकाच माळेचे मणी असुन मुस्लीम समाजाने त्यांना मतदान करु नये. मला समाजाच्या हितासाठी भरभरुन मतदान करा, नितेश राणेंना मतदान करुन समाजाच्या विरोधात भुमिका कोणीही घेवु नये, त्याची इतिहासात नोद होईल. कारण, अशा कृतीमुळे मुस्लीमांच्या एकीला तडा जाईल. नितेश राणेंना सजा देण्यासाठी एकवेळ मला पाठिंबा द्या आणि मतदान करा. नक्कीच नितेश राणेंना त्यांची जागा दाखवुन देईन, मुस्लीम समाजाचा विश्वास सार्थकी लावेन, असा विश्वास कणकवलीचे अपक्ष उमेदवार बंदेनवाज खानी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे.
कणकवली विधानसभा निवडणुकीत मुस्लीम समाजावर बेताल वक्तव्य करणाऱ्या नितेश राणें विरोधात उतरण्यापुर्वी मी आमच्या समाजाचे नेते व माझ्या सहकार्ऱ्यांना विश्वासात घेवुन निर्णय घेतला. तिनही तालुक्यामध्ये गेल्या १५ ते २० दिवसात फिरताना आमच्या मुस्लीम वाड्या-वस्त्यांवर मोठा प्रतिसाद लाभला आहे. आता मला माझे बांधव प्रचारासाठी बोलवत आहेत. वेळ कमी असल्याने मी सर्वांपर्यंत पोहचु शकत नाही, मात्र सर्वांचे आशिर्वाद माझ्या पाठीशी आहेत. चुकीच्या पद्धतीने सामाजिक पद्धतीत तेढ निर्माण करु पाहणाऱ्या आ.नितेश राणें विरोधात समाजात विरोध आहे. कुठेतरी सर्वधर्म समभाव व एकात्मता टिकविण्यासाठी हा लढा देण्याचा मी निश्चय केला. त्याचे मला समाधान मिळत असल्याचे बंदेनवाज खानी यांनी सांगितले.
सर्व मुस्लीम बांधव असतील त्यांना सांगु इच्छतो, जेव्हा रामगिरी महाराज चुकीची वक्तव्य केले. अशा वक्तव्याला आ.नितेश राणे यांनी समर्थन केले. तिथे जावुन त्यांचे स्वागत केले असेल त्याचे नाव नितेश राणे आहे. अशा आमदार नितेश राणेंना निवडणुकीच्या माध्यमातुन त्यांना मला शिक्षा द्यायची आहे. नितेश राणेंनी समाजाबद्दल केलेली बालीश वक्तव्य चुकीची आहेत. नितेश राणेंना मुस्लीम बांधवानी मतदान करु नये, असे आवाहन अपक्ष उमेदवार बंदेनवाज खानी यांनी केले आहे.