सिंधुदुर्ग : कणकवली एस. टी. स्थानकावर दोन बस च्या धडकेत वैभववाडीतील उंबर्डे येथील महिला फातिमा बोथरे हीचा मृत्यु झाला होता. विधानसभा निवडणूक अपक्ष उमेदवार नवाज खानी यांनी त्या महिलेच्या उंबर्डे येथे घरी जाऊन नातेवाईकांचे सांत्वन केले छोट्या दोन मुलींची भेट घेऊन धीर दिला . हा अपघात सर्वानाच दुखत आहे.
नवाज खनी यांनी एस. टी. स्थानकावर जाऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरत तात्काळ मदत मिळवून देण्यासाठी सर्वपक्षीय ठिय्या आंदोलनात सहभागी झाले होते.