उबाठा महिला आघाडी जिल्हाप्रमुख निलम पालव यांची राणेंवर टीका
कणकवली : प्रदेशाचा कोणत्याही कारभार विकासात्मक आणि गतीने करायचा असेल तर राजकीय इच्छाशक्ती बरोबरच प्रशासनाची जोड देखील लागते. मात्र, येथील आमदाराच्या कार्यपद्धतीमुळे चांगले अधिकारी जिल्हा देण्यास नकारघंटा दाखवीत आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाची गती मंदावली आहे. याला विद्यमान आमदार जबाबदार असल्याची टीका उबाठा शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख नीलम सावंत-पालव यांनी केली आहे.
येथील आमदारांना प्रसिद्धीची सवय आहे. यासाठीची त्यांची धडपडत सुरू असते. त्याच्या परिणामांची कोणतीही चिंता त्यांना नसते. अशा कार्यपद्धतीमुळे जिल्ह्याची वाटचाल बिहार आणि उत्तर प्रदेश या दिशेने सुरू झाली असल्याचे दिसते. मच्छीमारांच्या समस्येला तोंड फोडण्यासाठी विद्यमान आमदारांनी अधिकाऱ्यांवर बांगडा भिरकावून मारला. तर मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी अधिकाऱ्यांना चिखलाची अंघोळ घातली. या दोन्ही घटनांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याची प्रचंड बदनामी झाली. वास्तविक दोन्ही समस्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी घटनात्मक आणि सनदशीर मार्ग उपलब्ध होते. परंतु आमदारांनी स्वस्त पर्याय निवडला. त्यामुळे अधिकारी वर्गात आपल्या जिल्ह्याबद्दल नाराजीची आणि दहशतीची भावना निर्माण झाली आहे. चांगले अधिकारी जिल्ह्यात येण्यास धजावत नाहीत. त्याचा परिणाम जिल्ह्याच्या विकासावर होत असल्याचे सो. त्यांनी पालव यांनी म्हटले आहे.
पारकर अनेक वर्षे कणकवलीचे सरपंच होते. नगराध्यक्ष म्हणून देखील कारकीर्द गाजवली. पण कोणत्याही अधिकाऱ्यांविरोधात हिंसक आंदोलन कधीही केलेले नाही. मतदारसंघाला विकासाच्या व प्रगतीच्या महामार्गावर नेण्यासाठी पारकर यांना संधी द्यावी, असे आवाहन सो. पालव यांनी केले आहे.