महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांना वाढता पाठिंबा
कणकवली : फणसे गावातील थोटमवाडी येथील भाजपच्या बहुसंख्य कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.
यावेळी प्रवेशकर्ते म्हणाले, येणाऱ्या २३ तारीख तारीखला याठिकाणी या मतदार संघामध्ये आपल्याला विजयाचा गुलाल उधळाचा आहे. लोक या घराणेशाही च्या कारभाराला, सत्ताधाऱ्यांच्या कारभाराला कंटाळले आहेत. गेल्या दहा वर्षात येथील स्थानिक आमदारांनी कोणत्याही प्रकारची विकास कामे केली नाही. येथील विकास फक्त सर्वसामान्य जनतेच्या हाकेला धावून येऊन संदेश पारकर करू शकतात, म्हणुन आम्ही त्यांच्या पक्षात प्रवेश करत आहोत. तसेच आम्ही संदेश पारकर यांच्या विजयाचा संकल्प केलेला आहे. संदेश पारकरच सर्वसामान्य नागरिकांना न्याय देऊ शकतात, असे मत प्रवेशकर्त्यांनी व्यक्त केले.
यावेळी मंगेश राऊळ, सतीश गावकर, सतीश थोटम, प्रकाश राऊळ, जितेंद्र थोटम, अमृत थोटम, दिशा थोटम, सूर्यकांत नवलू, दिलीप थोटम, अनिल नवलू यांच्यासह वीस ते पंचवीस जणांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.
यावेळी संदेश पारकर यांच्यासोबत विष्णू गाडी, संदीप ढोलकर, अमित फणसेकर, प्रसाद करंदीकर, फरीद काझी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.







                                    