कणकवली नगरपंचायतच्या वतीने शहरात मतदान जनजागृती रॅली
कणकवली : शहरात मतदान जनजागृती कार्यक्रम मतदार संघ २६८ कणकवली, देवगड, वैभववाडी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान जनजागृती व मतदानाची टक्केवारी वाढविण्यासा टीव्हीठी प्रबोधनपर विविध उपक्रम राबविण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यानी सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने गुरुवारी येथील कणकवली कॉलेजच्या पटांगणावर जिल्हाधिकारी अनिल पाटील, तहसिलदार दीक्षांत देशपांडे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, नायब तहसिलदार दिलीप पाटील, जिल्हा प्रशासन अधिकारी विनायक औंधकर, मुख्याधिकारी श्रीम. गौरी पाटील, कणकवली कॉलजचे प्राचार्य महलिंगे सर, विद्यामंदिर हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. कांबळे, हरिभाऊ भिसे, जुनियर कॉलेजचे श्री. सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मतदान शपथ, मतदार हस्ताक्षर, मतदार सेल्फी पॉईंट अभियान व कणकवली कॉलेज तर्फे पथनाट्य राबविण्यात आले. तसेच कणकवली नगरपंचायत व कणकवली कॉलेज तर्फे शहरात लोकशाही दिंडीसह पायी रॅली आयोजित करण्यात आली. सदर रॅलीमध्ये शहरातील बचत गटाच्या महिला, कणकवली कॉलेजची मुले, शहरातील नागरिक व कणकवली नगरपंचायत कर्मचारी मिळून साधारणपणे पाचशे जण उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश पवार यांनी केले.
नगरपंचायतीतर्फे राबविण्यात येणा-या उपक्रमामध्ये नागरिकांनी सहभागी होऊन २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील, व कणकवली नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी केले.