२५ वर्षे खराब झालेल्या रस्त्यावर ग्रीट टाकून रस्ता वाहतुकीस होणार सुरक्षित!
कणकवली : नरडवे घोलान दुर्गानगर इथे उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख उत्तम सुरेश लोके यांनी एक महिन्यापूर्वी दिलेला शब्द पाळला असून,आपल्या स्वखर्चाने जो रस्ता गेली पंचवीस वर्षे खराब असलेल्या रस्त्यावर ग्रीट आणि खडी टाकून रस्त्याची डागडुजी करण्यात येणार आहे.
त्यामुळे गावातील ग्रामस्थांनी समाजसेवक उत्तम लोके यांचे मनस्वी आभार मानले. आणि यापुढे या गावातील अशीच सामाजिक कामे करण्याचे आश्वासन श्री.लोके यांनी दिले.