कणकवली : शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक डॉ. सोमनाथ दत्तात्रय कदम यांच्या प्रा. सोमनाथ कदम ‘प्रागतिक चळवळीचे प्रवर्तक’ या ग्रंथास कोकण मराठी साहित्य परिषदेच्यावतीने देण्यात येणारा प्रभाकर पाध्ये स्मृती साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
प्रा. सोमनाथ कदम यांनी गौतम बुद्ध, वर्धमान महावीर, महंमद पैगंबर, – चार्वाक, संत कबीर, गुरु रविदास, – बसवेश्वर, चक्रधर स्वामी, संत नामदेव, संत सावता माळी, अहिल्यादेवी – होळकर, छत्रपती शिवराय, – सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील अशा संत महात्म्यांच्या प्रागतिक विचारांची समीक्षा मांडली आहे.
कोकण मराठी परिषदेच्यावतीने दरवर्षी साहित्य वाङ्गय पुरस्कार देऊन आघाडीच्या साहित्यिकांच्या साहित्यकृतींना सन्मानित करण्यात येते. डॉ. सोमनाथ कदम यांच्या ‘प्रागतिक चळवळीचे प्रवर्तक’ या समीक्षा ग्रंथास वर्ष २०२२- २३ करीता प्रभाकर पाध्ये स्मृती साहित्य पुरस्कार १७ नोव्हेंबर रोजी कवी केशवसुत स्मारक, मालगुंड जिल्हा रत्नागिरी येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
याबद्दल प्रा. सोमनाथ कदम यांचे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय तवटे, चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे, सचिव विजयकुमार वळंजू, सर्व विश्वस्त व पदाधिकारी, प्रभारी प्राचार्य युवराज महालिंगे, तसेच शैक्षणिक व साहित्य क्षेत्रातील अनेकांनी अभिनंदन केले आहे.