3.6 C
New York
Friday, November 22, 2024

Buy now

संदेश पारकर यांच्यावर सारस्वत बँकेचे १ कोटी ३० लाखाचे कर्ज | ते कर्ज नेमके कोणी भरले ?

नितेश राणेंनी संदेश पारकर यांचं कर्ज भरून त्यांना आपल्या विरोधात उभे केले

कणकवली | मयुर ठाकूर : महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी सारस्वत बँकेकडून १ कोटी ३० लाखाचे कर्ज घेतले होते. हे कर्ज निवडणुकीआधी आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून भरण्यात आले. त्‍यामुळेच पारकर यांना आपला उमेदवारी अर्ज दाखल करता आला. ही बाब खोटी असेल तर तसे संदेश पारकर यांनी १५ नोव्हेंबर पर्यंत जाहीर करावी अन्यथा आम्‍हीच त्याबाबतची पोलखोल करू असा इशारा अपक्ष उमेदवार नवाज खानी यांनी दिला. त्याचबरोबर माझ्या प्रचार वाहनांचा ताफा शिवसेना ठाकरे पक्ष आणि आमदार नितेश राणे यांचे कार्यकर्ते अडवत आहेत. काल वैभववाडी प्रचारा दरम्‍यान माझ्या गाडीवर राणे समर्थकांकडून हल्‍ला देखील झाला असल्‍याचा आरोप श्री.खानी यांनी केला. श्री.खानी यांनी आज कणकवलीत पत्रकार परिषद घेऊन आमदार नितेश राणे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्यावर जोरदार टीका केली. श्री.खानी म्‍हणाले, संदेश पारकर हे सातत्‍याने माझ्यावर टीका करत आहेत. आमच्या समाजात येऊन खानी हे आमदार नितेश राणे यांचे माणूस असल्‍याचे सांगत आहेत. पण वस्तुस्थिती वेगळी आहे. संदेश पारकर हेच राणेंचे माणूस आहेत. ऐन निवडणूकीपूर्वी पारकर यांचे १ कोटी ३० लाख रूपयांचे कर्ज राणे यांनीच भरले आहे. त्‍यामुळे पारकर हे राणेंचेच माणूस असल्‍याचे सिद्ध झाले आहे. एवढेच नव्हे तर जर पारकर निवडून आले तर ते सरकार बनविण्यासाठी भाजपलाच साथ देणार आहेत. श्री.खानी म्‍हणाले, मागील चार दिवसापर्यंत मी मतदारांची दोन क्रमांकाची पसंती होतो. मात्र गेल्‍या दोन दिवसांत मी एक क्रमांकावर राहिलो आहे. त्‍यामुळे माझ्यावर दबाव आणला जात आहे. प्रचार करताना गाड्या अडवल्‍या जात आहेत. काल वैभववाडी कणकवली प्रचारा दरम्‍यान माझी गाडी फोडण्याचाही प्रकार झाला. याबाबत मी पोलिसांना कळवले आहे. दरम्‍यान आमदार नितेश राणे हे जाती धर्मामध्ये फुट पाडण्याचे काम करत आहेत. मुस्लीम समाजाबाबत सातत्‍याने वेगळी वक्तव्ये करत आहेत. मात्र आम्‍ही भारताची अखंडता, एकात्मता यासाठी लढा देत आहोत. ज्‍याप्रमाणे आपले सैनिक सिमेचे रक्षण करत आहेत. त्‍याचप्रमाणे आम्‍ही जाती धर्मात तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्ती विरोधात लढत आहोत. हा लढा देत असताना आमच्या जीवाला बरेवाईट झाले तरीही आम्‍हाला त्‍याची काहीही फिकीर नाही.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!