18.9 C
New York
Wednesday, April 30, 2025

Buy now

महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचा मेळावा शनिवारी कुडाळमध्ये

आमदार वैभव नाईक यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन होणार

तालुकाप्रमुख राजन नाईक यांची माहिती

कुडाळ (प्रतिनिधी) : महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचा मेळावा शनिवार, ९ नोव्हेंबर रोजी कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास ठाकरे शिवसेनेचे नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती ठाकरे शिवसेनेचे कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक यांनी दिली. तर महाविकास आघाडीचे कुडाळ-मालवण मतदारसंघातील उमेदवार तथा विद्यमान आमदार वैभव नाईक यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटनही सकाळी १० वाजता कुडाळ शिवसेना शाखा येथे शिवसेना नेते विनायक राऊत यांच्या हस्ते होणार आहे.

कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार वैभव नाईक यांच्या विजयी हॅट्ट्रिकसाठी या मेळाव्यास महाविकास आघाडीमधील
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, आम आदमी पार्टी आदी सर्व घटक पक्षांचे नेते, मविआमधील अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची यांची उपस्थिती असेल. महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी या मेळाव्याला बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राजन नाईक यांनी केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!