8.5 C
New York
Tuesday, December 10, 2024

Buy now

कणकवली शहरात संदेश पारकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ | महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनमध्ये उस्फुर्त प्रतिसाद

सौ.समृद्धी संदेश पारकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून केला शुभारंभ

कणकवली शहरातुन दीड हजाराचे मताधिक्य घेऊन संदेश पारकर विजयी होतील – सुशांत नाईक

कणकवली | मयुर ठाकूर : कणकवली शहरात महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचाराचा झंजावती शुभारंभ श्री स्वयंभू मंदिर व परमहंस भालचंद्र महाराज मठ यांचे आशीर्वाद घेऊन करण्यात आला. सौ. समृद्धी संदेश पारकर यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.
संदेशभाई यांचे कणकवलीच्या सरपंच पदापासून ते नगराध्यक्ष पदापर्यंत कणकवली शहराच्या विकासात मोठे योगदान आहे. येत्या २३ नोव्हेंबर मोठ्या मताधिक्याने संदेशभाई विजयी होतील. कणकवली शहरातून संदेश पारकर 1,500 हजाराचे मताधिक्य घेऊन विजयी होतील असा विश्वास युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी व्यक्त केला.
कणकवलीतील आताच्या सत्ताधाऱ्यांनी टक्केवारी राजकारणा पलीकडे विकासात्मक कामे केली नाहीत. कणकवली शहरातील कित्येक प्रकल्प हे आताच्या सत्ताधाऱ्यांनी व आमदार नितेश राणे यांनी घोषित केली. त्यातले प्रत्येक्षात किती आणले ? ए. जी. डॉटर्स हा प्रकल्प आणतो म्हणून सांगून कणकवली नगरपंचायत ची जमीन गहाण ठेऊन कणकवली च्या जनतेची या सत्तधारी व आमदार यांनी फसवणूक केली आहे. अशी जोरदार टीका यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केली. संदेश पारकर आमदार झाल्यानंतर आपले महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर प्रथमता यांनी नगरपंचायतची गहाण ठेवलेली जमीन आम्ही सोडवणार. तसेच कणकवलीच्या जनतेला मान्य असणारी व शास्वत कामे आम्ही करणार. संदेश पारकर आमदार झाल्यानंतर व आपले महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर शहराच्या विकासाचा बॅकलॉग राहिला तो पूर्ण करण्याची जबाबदारी आमची असेल असा विश्वास यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिला.
काँग्रेसतालुका अध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांनी आपले महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर हे कणकवली शहरातून चांगल्या प्रकारचे लीड घेऊन विजयी होतील. व संदेश पारकर यांच्या विजयामध्ये शहराचा सिंहाचा वाटा असेल असा विश्वास यावेळी प्रदीप मांजरेकर यांनी व्यक्त केला.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, सौ. समृद्धी पारकर, रुपेश नार्वेकर, प्रदीप मांजरेकर, सौरभ पारकर,उत्तम लोके, दिवाकर मुरकर, सुजित जाधव, तेजस राणे, आदित्य सापळे,संतोष पुजारे, सोहम वाळके, साई कोदे, प्रद्दूम मुंज,योगेश मुंज, जय शेट्ये, समीर पारकर, प्रसाद अंधारी, कौशिक पारकर, अजित काणेकर, नीलम पालव, दिव्या साळगांवकर, सेजल पारकर, शीतल सावंत, रोहीनी पिळनकर, शीतल पारकर, नेहा पारकर, साधना माने, पूनम म्हापसेकर व आदी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!