0.7 C
New York
Wednesday, February 12, 2025

Buy now

नवाज खाणी यांचा वैभववाडी तालुक्यात प्रचाराचा झंझावात

वैभववाडी : कणकवली विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार नवाज खाणी यांनी आज वैभववाडी तालुक्यात झंझावाती प्रचार दौरा केला. नवाज खाणी यांनी वैभववाडी तालुक्यातील मुस्लिम बांधवांसह हिंदू बांधवांच्या घरोघरी जात आपल्या बॅट निशाणीचा प्रचार केला. नवाज खाणी यांनी आपण विधानसभा निवडणूक का लढवत आहोत हे मतदारांची भेट घेऊन सांगण्यावर जोर दिला असून मतदारांना आपली भूमिका पटवून सांगत आहेत. आज वैभववाडी तालुक्यातील वाभवे-वैभववाडी शहरासह तालुक्यातील गावांत जाऊन नवाज यांनी आपला प्रचार केला. बॅट निशाणीसमोरील बटन दाबून विकासाला आपले मत देण्याचे आवाहन त्यांनी वैभववाडी तालुका वासीयांना केले. नवाज खाणी यांच्या प्रचाराला मतदारांचा वाढता प्रतिसाद मिळत असून आपण नवाज यांच्यासोबत असल्याचे मतदार सांगत आहेत.

यावेळी आरिफ काझी फैज खान, जैद धोपावकर, विनायक जाधव, रोहित पटाडे, अक्रम शेख आदी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!