सावंतवाडी : महायुतीचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघांचे उमेदवार आणि गेल्या तीन टर्म चे आमदार दीपक केसरकर यांच्या विरोधात गेल्या काही महिन्यांपासून बॅनर वॉर सुरू असून, त्यांच्या विरोधात अनेक बॅनर लाऊन विविध प्रश्नांचे जाब विचारत त्यांच्यावर टीका केली जात आहे. अशातच आज पुन्हा एकदा सावंतवाडी बसस्थानक परिसरात दीपक केसरकर यांच्या विरोधात बॅनर लाऊन अज्ञाताने जाब विचारला आहे.
या बॅनर द्वारे त्यांना राणे यांचा दहशतवाद संपला का…? असा प्रश्न विचारत 2014 साली पालकमंत्री झाल्यावर रमेश गोवेकर प्रकरण?, अंकुश राणे प्रकरण?, रमेश शंकर मणचेकर प्रकरण? , रावजी वाळंजू प्रकरण? या सर्व गुन्हांची चौकशी करणार होतात त्यांचे काय झाले असा सवाल देखील या बॅनर मधून विचारला आहे. यावेळी काही वर्षांपूर्वी वेंगुर्ला येथे राणे पिता पुत्रांचा दहशतवाद दिसला परंतु, काही दिवसांपूर्वी मालवण मद्ये राणे पिता पुत्रांनी पोलिसांसोबत घातलेले धुमशान आपल्याला मान्य से का..? असा प्रश्न देखील विचारला आहे. यावेळी वेळोवेळी संस्कृतीची भाषा करणाऱ्या दीपक केसरकर यांना ही संस्कृती मान्य आहे का..? असा सवाल देखील विचारला आहे. परंतु, हा बॅनर कोणी लावला याबाबत माहिती मिळाली नाही. परंतु, या बॅनर ची जोरदार चर्चा मतदारसंघात चालू आहे.