कणकवली : कणकवली शहर भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष पदी मंदार सोगम यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून सदरचे नियुक्ती पत्र भाजप कणकवली शहरध्यक्ष अण्णा कोदे यांनी दिले. मंदार सोगम यांनी काही दिवसापूर्वी भाजप पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांच्यावर उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
यावेळी भाजयुवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, भाजप महिला कणकवली तालुकाध्यक्ष संजना सदडेकर, सोनू सावंत, बंडू गांगण, संतोष चव्हाण, शिशिर परुळेकर, ऋत्विक नलावडे, कल्याण पारकर, सागर राणे, विजय इंगळे, संदीप मेस्त्री यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.