28.6 C
New York
Friday, July 11, 2025

Buy now

साळगाव मधील मनसेचे पिंगुळी विभागप्रमुख सुरज घाटकर यांनी आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हाती घेतली मशाल

आमदार वैभव नाईक यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रभावित होऊन पक्षप्रवेश; प्रवेशकर्त्यांनी दिली प्रतिक्रिया

कुडाळ : तालुक्यातील साळगाव येथील मनसे चे विभागप्रमुख सुरज घाटकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आ.वैभव नाईक यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रभावित होऊन आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल हाती घेतली आहे. आ. वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले आहे.
यावेळी बोलताना सुरज घाटकर म्हणाले आमदार वैभव नाईक यांच्या कार्यपद्धतीवर प्रेरित होवुन आपण प्रवेश करत असून आमदार वैभव नाईक यांच्या विजयात आम्ही मोलाचा वाटा उचलू असे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार वैभव नाईक त्यांचे स्वागत करताना म्हणाले आपण घेतलेला निर्णय किती योग्य आहे हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसेल,आपण टाकलेला विश्वास सार्थकी लावण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू असे यावेळी सांगितले.
यावेळी रवींद्र तळेकर,विठ्ठल गावडे,बाबू घाटकर,महेश गावडे, अनिकेत गायचोर या मनसेच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते,उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत,कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक,तालुका संघटक बबन बोभाटे, राजू कविटकर,अनुप नाईक, गुरू सडवेलकर,सचिन ठाकूर,बंड्या कोरगांवकर,रोहित सावंत, दत्ताराम लाड, नामदेव तावडे,तृप्ती सावंत सिद्धी मेस्त्री,तेजस्विनी सावंत, बाबाजी सावंत,मानसी धुरी आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!