7.8 C
New York
Tuesday, December 10, 2024

Buy now

वीज पडून चार जनावरांचा मृत्यू | संदेश पारकर यांनी घेतली त्या शेतकरी कुटुंबाची भेट

कणकवली | मयुर ठाकूर : विजेच्या गडगडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने गुरुवारी फोंडा झर्येवाडी येथे वीज कोसळून महादेव बाणे यांच्या मालकीची चार जनावरे दगावली. या जनावरांमध्ये १ गाभण गाय व ३ बैल यांचा समावेश आहे. या दुर्घटनेमुळे श्री. बाणे कुटुंबियांच्या हातातोंडाचा घास हिरावला गेला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कणकवली विधानसभेचे उमेदवार संदेश पारकर यांनी घटनास्थळी भेट देऊन श्री. बाणे यांना प्रशासनाकडून जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.

सदर घटनेचा प्रशासकीय स्तरावर पंचनामा करण्यात आला आहे. दरम्यान या दुर्घटनेमुळे महादेव बाणे यांचे मोठे नुकसान झाले आहे. बदलत्या निसर्ग चक्रामुळे परतीचा पाऊस काही कमी होत नाही. हा पाऊस केव्हाही, अवेळी पडत असल्यामुळे भातकापणीची कामे रेंगाळली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच जनावरे दगावल्यामुळे या शेतकरी कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. मात्र भविष्यात नक्कीच शेतकरी हिताचा विचार करून योग्य निर्णय घेतला जाईल. चिंता करू नका अशा शब्दात संदेश पारकर यांनी त्या शेतकऱ्यांना धीर दिला. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर, गनंजय तेली, पराग म्हापसेकर, आदि उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!