8.5 C
New York
Tuesday, December 10, 2024

Buy now

महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांचा जोरदार प्रचार सुरू

कणकवली | मयुर ठाकूर : कणकवली विधानसभा मतदारसंघात उमेदवारांनी आता घरोघरी प्रचारावर भर दिला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर हे कणकवली तालुक्यात विविध गावांमध्ये जाऊन प्रचार करीत आहेत. संदेश पारकर यांनी कणकवली शहरासह फोंडाघाट, तळेरे, खारेपाटण या भागात प्रचार जोरदारपणे सुरू केला आहे.

कणकवली शहरातील बांधकरवाडी, साईनगर, वरचीवाडी, शिवशक्ती नगर येथे प्रचार करीत त्यांनी ज्येष्ठ व प्रतिष्ठित लोकांशी संवाद साधला. लोकांच्या घरात जात त्यांच्याशी हितगुज साधत त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न संदेश पारकर करीत आहेत. कणकवली शहरात प्रचार केल्यानंतर बोलताना संदेश पारकर म्हणाले, गेली अनेक वर्षे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. अनेक विकास प्रश्न मार्गी लावले. जनतेने मला नेहमीच साथ दिली आहे. जनतेशी माझे भावनिक नाते आहे त्यामुळे जनतेच्या प्रेमाखातर मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असून यावेळी मिळत असलेल्या प्रतिसाद पाहता माझा विजय हा निश्चित आहे. ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे आणि प्रामाणिक काम करणार्‍या माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला येथील जनता निश्चितपणे विधानसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी देईल असा विश्वास यावेळी संदेश पारकर यांनी व्यक्त केला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!