7.8 C
New York
Tuesday, December 10, 2024

Buy now

“लाव रे तो व्हिडीओ’ करत नवाज खाणी यांनी संदेश पारकरांच्या वक्तव्याचा घेतला समाचार

नितेश राणे करत असलेल्या वक्तव्याला आमचा समाज योग्‍य वेळी उत्तर देईल

अपक्ष उमेदवार नवाज खानी यांनी केली टीका

कणकवली | मयुर ठाकूर : विधानसभा मतदारसंघात माझ्या विरोधात लढणारे नितेश राणे आणि संदेश पारकर म्हणजे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. नितेश राणे हे आमच्या समाजाला बदनाम करण्याचे काम करीत असून नितेश राणे मुस्लिम समाजाविरोधात बोलत असताना त्यावेळी संदेश पारकर गप्प का होते ?असा सवाल करताना नितेश राणे व संदेश पारकर यांना आमचा समाज योग्‍य वेळी उत्तर देईल असे कणकवली विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार नवाज खानी यांनी सांगितले.

कणकवली विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार नवाज खानी हे कणकवलीत पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, सध्या ठाकरे शिवसेनेत असलेले बहुतांश कार्यकर्ते हे राणेंचेच समर्थक आहेत. त्‍याप्रमाणे संदेश पारकर हे देखील नितेश राणे यांचेच प्यादे आहेत. ते माझ्या विरोधात बोलून मुस्लीम मतदारांमध्ये गैरसमज परसविण्याचे काम करत आहेत . तसेच आमदार नितेश राणे यांनी आजवर मुस्लीम समाजाबाबत जी वक्तव्ये केली आहेत. त्‍याला आमचा समाज योग्‍य वेळी उत्तर देईल.

ते म्‍हणाले, संदेश पारकर हे मुस्लीम वस्तीमध्ये येऊन माझ्या विरोधात आरोप करत आहेत. नवाज खानी यांना नितेश राणे यांनीच मतविभाजनासाठी उभे केले असल्‍याचे ते सांगत आहेत. वस्तुत: मला निवडणुकीला उभे राहा असे सांगण्याची पात्रता नितेश राणेंमध्ये नाही. खरं तर नितेश राणे आणि संदेश पारकर हे मतदारांना मुर्ख बनविण्याचे काम करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अमित शहा यांची बोलणी चालू आहेत. मतदान झाल्‍यानंतर ही ठाकरे शिवसेना आणि भाजप एकत्र येऊ शकतात. त्‍यामुळे या दोन्ही उमेदवारांना माझा मतदार ओळखून आहे.

नवाज खानी म्‍हणाले, नितेश राणे यांनी अनेक वेळा मुस्लीम समाजा विरोधात वक्तव्ये केली होती. पण सामाजिक सलोखा राखण्यासाठी कुणी विरोध व्यक्‍त केला नाही. आमचा समाज मतदानाच्या माध्यमातून त्‍यांना योग्‍य ते उत्तर देतच आहे. परंतु मुस्लीम समाजाबाबत राणे वक्तव्य करत होते, त्‍यावेळी त्‍याचा निषेध करण्यासाठी संदेश पारकर कधीही रस्त्यावर उतरले नाहीत. कारण त्‍यांना राणेंची नाराजी ओढवून घ्यायची नव्हती. आजही संंदेश पारकर हे राणेंचेच समर्थक आहेत. फक्त ते ठाकरे सेनेमध्ये काम करत आहेत. पारकर हे राणेंसोबत असताना त्‍यांना कोकण सिंचन महामंडळ देण्यात आले होते. राणेंचे खास असल्‍याखेरीज एवढे मोठे पद त्‍यांना मिळालेले नाही. सतीश सावंत यांच्यासह अनेक ठाकरे सेनेचे पदाधिकारी मी राणेंचा माणूस असल्‍याचे आरोप करत आहेत. तशी वस्तुस्थिती असेल तर त्‍यांनी ते आरोप पुराव्यनिशी सिद्ध करावेत असेही श्री.खानी यांनी सांगितले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!