कशावरून नितेश राणे भाजपशी प्रामाणिक राहतील
संदेश पारकर यांनी घेतला राणेंचा समाचार
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांना राणे समर्थकांमुळे व राणे भाजपमुळे कुठलेही स्थान या जिल्ह्यात राहिलेले नाही. माजी आमदार प्रमोद जठार हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक नेतृत्व होतं. आणि त्यांच्या काळात चांगलं काम होत होती. जेव्हा ते आमदार झाले तेव्हा त्यांनी या जिल्ह्यात एक दूध डेरीचा प्रकल्प आणला. परंतु तो प्रकल्प उभा करत असताना कितीतरी अडचणी राणेंनी त्यांना केल्या. हे सर्वांना ज्ञात आहे. अनेक शेतकऱ्यांकडून म्हैशी घेऊन प्रमोद जठार यांच्या कार्यालयात म्हैशी बांधण्यात आल्या होत्या, आणि त्या प्रकल्पाला विरोध करण्यात आला होता. शेवटी नियती आहे. ज्या माजी आमदार प्रमोद जठारांच्या हस्ते आमदार नितेश राणे यांचा भाजपात प्रवेश झाला. आज माजी आमदार प्रमोद जठार यांचं जिल्ह्यात अस्तित्व काय.? प्रमोद जठार कुठे आहेत..? लोकसभेचे तिकीट मिळणार होतं, या आशेवर जठार होते. मात्र तिकीट मिळाले नाही. त्यानंतर प्रमोद जठार कुठे दिसले नाहीत. नाणार सारख्या प्रकल्पाला जनतेचा विरोध होता. पर्यावरणाला आणि निसर्ग सौंदर्याला घातक असलेला प्रकल्प जनतेला नको, असलेला प्रकल्प, नको अशी सर्वसामान्य शेतकऱ्यांची देखील आणि शिवसेनेची भूमिका होती. मात्र त्याला त्या ठिकाणी समर्थन केलं गेलं. या ठिकाणी रोजगार मिळणारा नाणार प्रकल्प आम्हीच आणणार. परंतु लोकसभेची निवडणूक उलटून चार महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटून गेला पण आजपर्यंत कुठेही नानार ची घोषणा नाही. त्यामुळे आता जिल्ह्यात नानार पण नाही आणि जठार पण नाही, अशी परिस्थिती झालेली आहे.
साखर कारखान्याच्या बाबतीत जठारांनी आग्रही भूमिका घेतली होती. राणे आणि जठार एकत्र मिळून या जिल्ह्यातल्या कणकवली तालुक्यात मोठा साखर कारखाना उभा करणार होते. याचे सर्वाधिकार राणेंनी जठरांना दिले ते सांगितले गेले. मात्र त्या साखर कारखान्याचे काय झाले? नाणारची भूमिका स्पष्ट आहे. साखर कारखान्याची देखील परिस्थिती तशीच आहे. तेच प्रमोद जठार भारतीय जनता पार्टीचा झेंडा घेऊन त्या ठिकाणी वावरत होते. मात्र या जिल्ह्यातील राणे समर्थक आणि राणे भाजपने जठारांचं अस्तित्व पूर्णपणे संपून टाकलेल आहे. मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांना राजकीय प्रवाहातून बाजूला करण्याचे काम राणे भाजपकडून सुरू आहे. राजकारणात जर पाहिलं तर राणे आजपर्यंत राजकारणात कोणासोबत देखील प्रामाणिक राहिलेले नाहीत. ज्यांनी ज्यांनी त्यांना मोठं केलं ज्यानी ज्यानी त्यांच्यावर उपकार केले त्या त्या लोकांवर राणे बेईमान झालेले आहेत. त्यांच्या रक्तामध्ये बेइमानी आहे. त्यामुळे मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांनी याच आत्मपरीक्षण केलं पाहिजे.
खरंतर आप्पासाहेब गोगटे यांचे बंधू अजित गोगटे आमदारकीला जेव्हा उभे राहिले तेव्हा त्यांच्या पराभव झाला होता. त्यावेळी नितेश राणेनी त्यांच्या कार्यालयावर अंडी फेकली होती. त्या कार्यालयावर हल्ला केला. त्यावेळी तिथे देवगड मध्ये जाणारा एकमेव कार्यकर्ता म्हणजे संदेश पारकर होते. त्यामुळे ही जी काय राजकीय अपप्रवृत्ती आहे ती या ठिकाणी गाडली गेली पाहिजे. माझा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांशी काही वाद नाही, कोणतंही भांडण नाही, फक्त राणे ही जी काय राजकीय अपप्रवृत्ती आहे. या अपप्रवृत्तीला माझा विरोध आहे. जिल्ह्यातील राणेशाही आणि घराणेशाही संपली पाहिजे. त्यामुळे मूळ भाजपच्या लोकांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. कारण या ठिकाणी नेमकं काय चाललंय ? आपण त्या ठिकाणी कोणाची लाचारी करतोय ? कोणाच्या पाठीमागे आहोत ? ज्यांच्यावर जनतेचा विश्वास राहिलेला नाही. भारतीय जनता पार्टीने राणेंना सर्वस्व दिलं. परंतु जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीची वाढ खुंटलेली आहे. कणकवली मतदार संघापूर्ती भारतीय जनता पार्टी मर्यादित आहे. आणि हेच नितेश राणे उद्या भारतीय जनता पार्टी सोबत राहतील की नाही ? असा सवाल संदेश पारकर यांनी उपस्थित केला.
भारतीय जनता पार्टीने राणेंना सर्वस्व दिल. त्यांचा मुलगा आमदारकीसाठी भारतीय जनता पार्टी सोडून शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. आणि आज या मतदारसंघात मात्र तुम्ही भारतीय जनता पार्टीशी प्रामाणिक रहा आणि नितेश राणे यांना आमदार करा ही भूमिका समजून सांगण्याची वेळ राणेंवर आली आहे.
स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या भावाला दुसऱ्या पक्षात पाठवून इथल्या कार्यकर्त्यांना नितेश यांनी आमदार होण्यासाठी राबवून घ्यायचं म्हणून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा मूळ भाजपचा कार्यकर्ता नाराज आहे. ही जी काय घराणेशाही आहे, भारतीय जनता पार्टीवर जो काही कब्जा आहे. तो इथल्या मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांना सहन होणारा नाही, असेही श्री. पारकर यांनी सांगितले.