23.6 C
New York
Sunday, August 31, 2025

Buy now

कणकवली शहरातील आरबी बेकरीला लागली आग ; अन्य दोन दुकानांना बसला फटका

कणकवली : शहरात पटवर्धन चौकात असलेल्या आरबी बेकरी ला शुक्रवारी (आज) पहाटे ४ वा. च्या सुमारास लागलेल्या आगीत आर बी बेकरी जळून पूर्णता बेचिराख झाली. यावेळी तेथे बाजूला असलेल्या राजू गवाणकर यांचे कार्यालय व बर्डे मेडिकलला देखील आगीचा फटका बसला.

घटनेची माहिती मिळताच कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह अनेक नागरिकांनी धाव घेतली. आगीचा भडका एवढा जोरात होता की, या आगीत चौकातील इतर दुकाने देखील आगीच्या भक्षस्थानी पडली.

कणकवली नगरपंचायत चा बंब येऊन देखील आग आटोक्यात येत नव्हती. अखेर कुडाळ एमआयडीसी व मालवण नगरपंचायत चां बंब बोलाविण्यात आला. त्यानंतर आग काही प्रमाणात आटोक्यात आली. मात्र ऐन दिवाळीत लक्ष्मीपूजन दिवशी ही दुकाने अक्षरशः बेचिराख झाली होती. यामध्ये लाखोंचे नुकसान झाले असून ही आग शॉर्ट सर्किट झाल्याने लागल्याचे बोलले जात आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!