10 C
New York
Thursday, November 21, 2024

Buy now

वैभव नाईक यांचा उमेदवारी अर्ज अवैध !

कुडाळमध्ये सात जणांचे दहा उमेदवारी अर्ज वैध..

कुडाळ : कुडाळ मालवण मतदार संघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या वैभव जयराम नाईक यांचा अर्ज अवैध ठरला आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळूशे यांनी दिली. अपक्ष वैभव नाईक यांच्या उमेदवारी अर्जाबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार वैभव विजय नाईक यांचे प्रतिनिधी अनंत पाटकर यांनी आक्षेप घेतला होता. त्यावर सुनावणी होऊन. सायंकाळी सव्वासात वाजता श्रीमती काळूशे यांनी हा निर्णय जाहीर. केला. दरम्यान कुडाळ विधानसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवार वैभव जयराम नाईक यांचा उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाल्याने आता ७ जणांचे १० उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळूशे यांनी माहिती दिली.
दरम्यान रासपच्या महिला उमेदवार उज्वला विजय येळाविकर (रा. उद्यमनगर कुडाळ) यांच्या उमेदवारी अर्जातील एबी फॉर्म मध्ये त्रुटी असल्यामुळे त्या पक्षातर्फे उमेदवार म्हणून निवडणूक लढवू शकत नाहीत, मात्र त्या अपक्ष म्हणून निवडणूक लढवू शकतात असे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती काळुशे यांनी सांगितले. सोमवार ४ नोव्हेंबर हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस असुन त्यानंतरच निवडणूकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
कुडाळ विधानसभा मतदारसंघासाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी कुडाळ मालवण विधानसभा निवडणुकीसाठी एकूण २५ अर्जांची विक्री झाली होती. त्यापैकी ८ जणांनी आपले ११ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विद्यमान आमदार वैभव विजय नाईक (रा. बिजलीनगर कणकवली) – महायुतीकडून शिवसेनेचे निलेश नारायण राणे (रा.वरवडे कणकवली) -महाराष्ट्र स्वराज्य पक्षाकडून अनंतराज नंदकिशोर पाटकर (रा.हुमरमळा अणाव) – बहुजन समाजवादी पार्टी कडून रविंद्र हरिश्चंद्र कसालकर (रा.कसाल) , रासप कडुन उज्वला विजय येळाविकर (रा. उद्यमनगर कुडाळ) – अपक्ष सौ.स्नेहा वैभव नाईक (रा.बिजलीनगर कणकवली) , अपक्ष प्रशांत नामदेव सावंत (किर्लोस गावठाण ता.मालवण) – यांचे आपले उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत.
बुधवारी उमेदवार अर्ज छाननीच्या दिवशी मुंबई कुर्ला पवई मुंबई उपनगर येथील अपक्ष उमेदवार वैभव जयराम नाईक यांच्या उमेदवारी अर्जातील प्रस्तावक जयराम प्रदीप नाईक यांच्या सहीला महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव नाईक यांचे प्रतिनिधी अनंत पाटकर यांनी आक्षेप घेतला. ती सही खोटी असल्याचे त्यांचे म्हणणारे होते. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी वैभव जयराम नाईक यांच्या प्रतिनिधींना याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी एका तासाची मुदत दिली. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या समक्ष सुनावणी झाली. त्यावेळी सुद्धा जयराम प्रदीप नाईक यांनी हि सही आपली नसल्याचे सांगितले. त्यानंतर जयराम नाईक यांच्या पॅनकार्ड, आधारकार्डची देखील खात्री करण्यात आली. अर्ज वैध ठरण्यासाठी दहा प्रस्तावक आवश्यक असतात. परंतु दहापैकी एका प्रस्तावकाची सही वैध नसल्याने निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळूशे यांनीअपक्ष उमेदवार वैभव जयराम नाईक यांचा उमेदवारी अवैध ठठरविला.
दरम्यान रासप उमेदवार उज्वला विजय येळाविकर (रा. उद्यमनगर कुडाळ) यांच्या एबी फॉर्म मध्ये त्रुटी आढळून आल्यामुळे श्रीमती यळाविकर यांच्या अर्जासोबतचा एबी फॉर्म अवैध ठरविण्यात आला. यामुळे येळाविकर रासप कडून निवडणूक लढवू शकत नसल्याचे श्रीमती काळुशे यांनी सांगितले. मात्र येळाविकर अपक्ष म्हणून रिंगणात राहू शकतात असेही निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी जाहिर केले.
दरम्यान 4 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून त्यानंतरच कुडाळ विधानसभा मतदार संघात किती उमेदवार रिंगणात राहणार हे चित्र स्पष्ट होणार आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!