8.7 C
New York
Thursday, November 21, 2024

Buy now

उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यास पक्षातून हकालपट्टी

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचा विशाल परब यांना इशारा

सावंतवाडी : अपक्ष उमेदवार विशाल परब यांच्या उमेदवारीशी भाजपचा कोणताही संबंध नाही. जर त्यांनी अर्ज मागे घेतला नाही तर पक्षविरोधी भूमिका घेतल्याबद्दल त्यांच्यावर पक्षातून हकालपट्टीची कारवाई होईल, अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली. महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केल्यानंतर ते बोलत होते.

सावंत म्हणाले, भाजपचे पदाधिकारी असणारे विशाल परब यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे सोमवारी संध्याकाळी निदर्शनास आले. प्रदेश भाजपच्या नेत्यांनी त्यांना उमेदवारी दाखल न करण्याच्या सूचना दिल्या होत्या. भाजपात जो संघटनेचा आदेश मानतो त्याला चांगले भविष्य असते. अजूनही चार दिवस आहेत, त्यांनी योग्य विचार करावा. त्यांनी अर्ज कायम ठेवल्यास भाजप व भाजप नेत्यांचे नाव घेण्याचा कोणताही अधिकार त्यांना राहणार नाही.

भाजप ही त्यागाची पार्टी आहे. ज्या देवेंद्र फडणवीस यांचे नाव त्यांनी घेतले त्यांनीदेखील त्याग केला आहे. विशाल परब यांच्या उमेदवारीशी भाजपचा कोणताही संबंध नाही. जर त्यांनी विहीत मुदतीत अर्ज मागे घेतला नाही तर त्यांची पक्षातून हकालपट्टी होईल, असे प्रभाकर सावंत यांनी सांगितले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!