24.6 C
New York
Saturday, August 30, 2025

Buy now

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

वैभववाडी : तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी राजेंद्र मधुकर पाठक (३५, सध्या रा. मानपाडा डोंबिवली, मूळ गाव फणसगाव, ता. देवगड) याच्यावर मुंबई येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना वैभववाडी हद्दीत घडल्यामुळे हा गुन्हा वैभववाडी पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. फिर्यादी तरुणी व संशयिती मुंबई येथे एकाच भागात राहतात. तिला पैशाची गरज होती. तिच्या ओळखीच्या माणसाने तिची संशयित आरोपीशी ओळख करून दिली. तो तिला मार्च २०२३ ला वैभववाडी येथे घेऊन आला. तिथे आठ दिवस एका हॉटेलवर थांबली होती. त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर अनेकवेळा त्याने अत्याचार केला.

दरम्यान तिने लग्नाचा तगादा लावला होता. मात्र तो लग्नाचे बोलणे टाळत होता. त्यामुळे संतप्त झालेली तरुणी तिच्या मुंबईच्या घरी गेली. तिथे गेल्यानंतर त्याचे लग्न झालेले आहे, त्याला दोन मुले आहेत अशी माहिती तिला मिळाली. ती घरी गेली त्यावेळी तिला संशयित आरोपी व त्याच्या पत्नीने मारहाण केली अशी फिर्याद पीडित तरुणीने मुंबई-डोंबिवली येथे दिली. त्याठिकाणी संशयित आरोपी व त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्हा हा प्रथम वैभववाडी येथे घडल्यामुळे अधिक तपासासाठी हा गुन्हा वैभववाडी पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. अधिक तपास वैभववाडी सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील अवसरमोल करीत आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!