4.1 C
New York
Friday, November 22, 2024

Buy now

खूप झाली दहशत, खूप झाला भ्रष्‍टाचार आता दडपशाही खपवून घेणार नाही ; संदेश पारकर

कणकवली | मयुर ठाकूर : खूप झाली दहशत, खूप झाला भ्रष्‍टाचार आता आम्‍ही दडपशाही खपवून घेणार नाही. यंदाच्या विधानसभेत कणकवली आणि कुडाळ मतदारसंघात मतदार राणे बंधूंना पराभूत करतील. तसेच महाविकास आघाडीच्या त्सुनामीत राणे परिवाराची धुळदाण उडेल असा विश्‍वास शिवसेना जिल्‍हाप्रमुख तथा महाविकास आघाडीचे कणकवली मतदारसंघातील उमेदवार संदेश पारकर यांनी आज व्यक्‍त केला. कणकवलीत आज भव्य रॅली काढून महाविकास आघाडीतर्फे संदेश पारकर यांनी जोरदार शक्‍तीप्रदर्शन केले. त्‍यानंतर कणकवलीत श्री.पारकर यांच्या प्रचाराची जाहीर सभा झाली.

यावेळी आमदार वैभव नाईक, माजी खासदार हुसेन दलवाई, भालचंद्र मुणगेकर, माजी आमदार परशूराम उपरकर, उपनेते गौरीशंकर खोत, शिवसेना नेते सतीश सावंत, महिला जिल्‍हा अध्यक्षा नीलम पालव, युवासेना जिल्‍हाप्रमुख सुशांत नाईक, अनंत पिळणकर, काँग्रेस जिल्‍हाध्यक्ष इर्शाद शेख आदी उपस्थित होते. संदेश पारकर म्‍हणाले, राणेंना फक्‍त त्‍यांची दोनच मुले सज्‍जन आहेत. इतर सर्व जण त्‍यांना कारटी वाटतात. दोन मुले वगळता सर्वांनाच ते शिव्या घालतात. त्‍यामुळे त्‍यांच्या सर्टिफिकेटची आम्‍हाला गरज नाही. राणेंनी ३५ वर्ष सत्ता उपभोगली. आमदार, मंत्री, मुख्यमंत्री ते केंद्रात उद्योगमंत्रीपदा पर्यंत गेले. पण या कालावधीत त्‍यांनी स्वत:ची हॉटेल, स्वत:चे पेट्रोल पंप, मेडिकल कॉलेज काढलं. सर्वसामान्यांसाठी काहीही केलंलं नाही. त्‍यामुळेच घराणेशाही, दडपशाही, भ्रष्‍टाचार विरोधातील आवाज बुलंद झाला आहे.

जनसामान्यां मनातील हा राग त्सुनामीच्या रूपाने बाहेर येईल आणि राणे परिवाराची धुळदाण केल्‍याशिवाय राहणार नाही. पारकर म्‍हणाले, अलीकडेच राज्‍य शासनाच्या माध्यमातून सिंधुदुर्गात ३ हजार कोटींची कामं आणली गेली. त्‍याचे ठेकेदार निश्‍चित करण्यात आले. या प्रत्‍येक कामात १२ टक्‍के प्रमाणे ३६० कोटींचं कमिशन राणे यांनी खाल्‍लं असून तोच पैसा या निवडणुकीत वापरला जात आहे. याच पैशातून मतदार खरेदी केले जाणार आहेत. त्‍यामुळे कार्यकर्त्यांनी लढला नाहीत तरी चालेल पण विकले जाऊ नका. दरम्‍यान सध्या गावागावात स्वाभिमानचे कार्यकर्ते लपून आहेत. या कार्यकर्त्यांनी माझ्या एका कार्यकर्त्यालाा जरी हात लावला तरी त्‍यााला तोडीस तोड उत्तर मिळेल असा इशाराही श्री.पारकर यांनी दिला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!