8.6 C
New York
Thursday, November 21, 2024

Buy now

कणकवली विधानसभा मतदारसंघात नवाज खाणी हे अपक्ष लढणार

मंगळवारी करणार उमेदवारी अर्ज दाखल ; सतीश सावंत यांनी केलेल्या आरोपांना दिले प्रत्युत्तर

तर आ. नितेश राणेंनी समाजाविषयी बोलताना संयम बाळगावा असा दिला इशारा

कणकवली | मयुर ठाकूर : राजकारण हे क्षेत्र नाही. माझा व्यवसाय आहे. हा निर्णय मला कठीण परिस्थितीने घ्यावा लागत आहे. मागील अनेक दिवस आपण राजकीय क्षेत्रात उतरण्याचा प्रयत्न केला त्यानुसार हा निर्णय घेऊन आपण राजकीय क्षेत्रात उतरलो आहे. आमदार नितेश राणे हे जी काही वक्तव्य करून समाजा समाजात तेढ निर्माण करत आहेत त्याच पार्श्वभूमीवर समाजा समाजा पर्यंत पोहोचून पाठिंबा मिळवला आहे.

यावेळी नवाज खाणी कणकवली येथील जलतरंग हॉटेलच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये पत्रकारांशी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

पुढे ते म्हणाले, आ.नितेश राणे यांच्याशी आमचे तेढ किंवा काही वैयक्तिक राग रोष नाही. आमदार हा जबाबदार असावा लागतो. आमदारांनी बोलताना संयम बाळगावा. लोक बाहेर गेल्यावर आम्हाला विचारतात असा आमदार का निवडून दिलात. त्यामुळे त्यांनी आपली भूमिका स्पष्ट ठेवाणे गरजेची होती. नितेश राणेंनी अपने जबान को लगाम लगाना चाहीये. नितेश राणेंनी अशी भूमिका घेणे चुकीची आहे. भविष्यात जर कोणाचा दबाव आला तर आपण अशा दबावाला आपण भीक घालणार नाही. आपण ठरवलं आहे निवडणूक लढणार आणि जिंकणार असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

सतीश सावंत यांनी टीका केली मात्र त्यांना मी माझा स्पर्धक मानत नाही. सतीश सावंत यांनी मला धमक्या देऊ नयेत आणि टक्केवारी च मला शिकवू नये. जे फोटो व्हायरल होत आहेत ते एडिट केले असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येते.

मी कोणी मोठा नेता मात्र मी कणकवली देवगड वैभववाडी च्या विकासासाठी मी हेतू समोर ठेवून उतरलो आहे. मधूदंडवते यांचा वारसा या जिल्ह्याला लाभला आहे, त्याप्रमाणेच ध्येय धोरणे ठरवून यात उतरलो आहे. त्यामुळे दाखल केलेला अर्ज मागे घेण्यासाठी दबाव आला तर त्याला आपण बळी पडणार नाही.

२०१८ पर्यंत श्री. खाणी हे काँग्रेस मध्ये सक्रिय होते. मात्र व्यवसायिक क्षेत्रात वळल्याने त्यांनी राजकीय क्षेत्रातून पाय बाहेर काढला होता. मात्र आता पुन्हा राजकारणात सक्रिय होणार असल्याचे श्री. खाणी यांनी सांगितले. तर येणारी २९ ऑक्टोबर ला आपण अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आल्याचेही ते म्हणाले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!