1.9 C
New York
Tuesday, December 23, 2025

Buy now

सिंधुदुर्ग राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सदस्य आय. वाय. शेख यांची सचिवपदी नियुक्ती

कुडाळ : तालुक्यातील वालावल जिल्हा परिषद मतदारसंघातील निष्ठावान कार्यकर्ते, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात गेली ३५ वर्षे क्रियाशील असलेल्या आय. वाय. शेख यांची सिंधुदुर्ग जिल्हा सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार त्यांना ही महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे.

शेख यांनी काँग्रेस पक्षात काम करत असताना सिंधुदुर्ग युवक काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष विलास गावडे यांच्या नेतृत्वाखाली आणि कुडाळचे कै. गणपतराव राऊळ यांच्या मार्गदर्शनात काम करण्याची संधी मिळाली.

जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांच्या नेतृत्वात काँग्रेसची संघटना बळकट करण्यासाठी ते प्रामाणिकपणे कार्य करतील अशी अपेक्षा असून त्यांनी संघटना वाढीसाठी सतत प्रयत्नशील राहण्याचा संकल्प व्यक्त केला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!